Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आम्ही पाहिलाय काळ तुमच्या संघर्षाचा…म्हणूनच अभिमान आहे तुमच्या नेतृत्वाचा !! अमल महाडिकविवेकानंद  कॉलेज  कुशल मनुष्यबळ घडविणारे लोकप्रिय महाविद्यालय-प्राचार्य आर. आर. कुंभारविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली मेन राजाराम हायस्कूलला भेटअन् छत्रपती शिवरायांचा पुतळा पुन्हा विद्युत रोषणाईने उजळलाभाजपा कार्यकर्त्यांचा मिरजकर तिकटीला जल्लोषकोल्हापुरात बहरणार ५४ वे पुष्प प्रदर्शन ! महावीर उद्यान येथे विविध कार्यक्रम !!शहाजी कॉलेजच्या खेळाडूंचे विद्यापीठ आंतरविभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यश  पोलीस क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशीप सातारा-कोल्हापूर पुरुष गटाला विभागूनफोंडाघाटत टँकरला आगविधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस ! मुंबईत घोषणा, कोल्हापुरात आनंदोत्सव !!

जाहिरात

 

जीवनगौरव पुरस्कारप्रसंगी डॉ. शकील मोमीन यांनी उलगडला वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास

schedule20 Oct 24 person by visibility 263 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “कोल्हापुरात १९८१ मध्ये माझी भूलतज्ज्ञ म्हणून सुरुवात झाली.१९९२ मध्ये भूलशास्त्र तंत्राचे पहिले थेट प्रात्यक्षिक भारतात पहिल्यांदा कोल्हापुरात दाखवण्यात आले. तसेच ऑपरेशन थिएटरमध्ये कुठली व किती प्राथमिक उपचार उपकरणे असली पाहिजेत याची मार्गदर्शक तत्वे देखील यावेळी ठरवण्यात आली. प्रथमच भूल देण्याच्या शुल्काचे दरपत्रक देखील याच वेळी ठरवण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात अनेक बदल घडले...”अशा शब्दांत कोल्हापुरातील नामांकित भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांनी आपला वैद्यकीय क्षेत्रातील जीवनप्रवास उलगडला. 
  कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेत डॉ.अतुल जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन डॉ. शकील मोमीन यांना सन्मानित करण्यात आले. या  पुरस्काराला उत्तर देताना डॉ. मोमीन म्हणाले, ‘पूर्वी रुग्णाला उपचाराकरिता मिरजेला जायला लागत होते. सरकारी इस्पितळात रुग्णसेवा उच्च दर्जाची मिळायची. आता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सर्व अत्याधुनिक उपचार हे कोल्हापुरातच मिळत आहेत. दर्जेदार व आधुनिक उपचार तंत्रज्ञानाबरोबरच उपचाराचा खर्च देखील वाढलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांवर रुग्ण नाखुश असू शकतो. यासाठी त्याचे समुपदेशन करणे, रुग्ण आणि नातेवाईकांना विश्वासात घेणे, तसेच डॉक्टरांनी आपल्या कर्मचाऱ्यांचेदेखिल समुपदेशन करणे आणि आपल्या सहव्यवसायिकावर टीका करणे टाळणे, हॉस्पिटलमध्ये सर्व नोंदी व्यवस्थित ठेवणे. या सर्व गोष्टींचे पालन डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे. 
सभासदांमुळे संघटनेला बळकटी येते. त्यामुळे डॉक्टरांनी आपल्याबरोबर आपल्या संस्थेचे देखील प्रगती साधली पाहिजे. सुरक्षित औषधे व तंत्र यांचा वापर करा.रुग्ण समाधानी असेल तरच आपण समाधानी राहू शकतो. याची काळजी डॉक्टरांनी घेणे आवश्यक आहे. रुग्ण व डॉक्टर या दोघांमध्ये विश्वास निर्माण होईल व आरोग्य सेवेचा दर्जाही वाढेल. दोघांनीही प्रथम आपले हक्क व कर्तव्ये यांची जाण ठेवली पाहीजे.” अशी अपेक्षा डॉ. मोमीन यांनी व्यक्त केली. 
 दरम्यान परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. केएमए फ्लॅश मासिकामध्ये डॉ. आदित्य कुलकर्णी यांच्या वैद्यकीय लिखाण करिता, तसेच डॉ राजेंद्र वायचळ व अनुराधा तेंडुलकर यांच्या लिखाणकरिता उत्कृष्ट लेख म्हणून मासिकाचे संपादक डॉ.प्रविण नाईक यांनी जाहीर यावेळी केले. तिघांनाही उत्कृष्ट लेखन याबद्दल 'रेखा मोहन ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  यावेळी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमोल कोडोलीकर, परिषदेचे अध्यक्ष डॉ. दिपक जोशी, परिषदेच्या सचिव डॉ. सरोज शिंदे, सहसचिव डॉ. अर्चना पवार, डॉ.राजेंद्र वायचळ, डॉ.अरुण धुमाळे, डॉ.आशा जाधव, डॉ. गीता पिल्लाई, डॉ.किरण दोशी,डॉ.आर.एम.कुलकर्णी, डॉ ए. बी पाटील, डॉ. प्रवीण नाईक, कृष्णा केळवकर,डॉ. प्रसाद तानवडे, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ.राजेंद्र चिंचणीकर, डॉ.विनय चौगुले, डॉ. बसवराज कडलगे, डॉ.उन्नती सबनीस, डॉ.आशुतोष देशपांडे, डॉ. स्नेहलदत्त खाडे, डॉ.अश्विनी पाटील, डॉ. प्रवीण वडगावे, डॉ. महावीर मिठारी, डॉ. शुभांगी पार्टे, डॉ.शीतल पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes