छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटप
schedule31 Oct 26 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर छत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेच्यावतीने दीपावली भेटवस्तू वाटप कार्यक्रम शनिवारी, (३१ ऑक्टोबर २०२६) आयोजित केला आहे. शिवाय पतसंस्थेने सभासदांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. पतसंस्थेतर्फे सभासंदांना पंधरा टक्के लाभांश दिला जातो. पतसंस्थेने सभासदांसाठी ५१ लाख इतकी कर्जमर्यादा केली आहे.मुदतबंद ठेवीवर व्याजदर आठ टक्के तर कायम ठेवीवर व्याजदर दहा टक्के आहे. सेवानिवृत्त शिक्षकांना पाच लाखांचे कर्ज दिले जाते. दरम्यान पतसंस्थेतर्फे यंदा, दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी तीन वाजता हॉकी स्टेडियम जवळील हॉटेल रॉयल पॅव्हेलियन येथे दुपारी तीन वाजता होत आहे. सभासदांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील यांनी केले आहे.