Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. गणपती कमळकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशनछत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटपगग गगख खख मनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळाजयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोरग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआयची कार्यशाळा, केएम फाऊंडेशनच्या माध्यमातून कळंब्यात उपक्रमगोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, समविचारी आघाडीची याचिका! शशिकांत पाटलांची निवड वैध ठरवा ! !पेटाळयाचा मास्तर…!लोकमंगलच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधांची उपलब्धता

जाहिरात

 

मनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळा

schedule31 Oct 26 person by visibility 22 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: जिल्हा परिषदेच्या विविध शाळेतील त्या साऱ्या शिक्षिका. त्या साऱ्यांनी एकत्र मनस्वी महिला समूहची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) संघाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर यांनी पुढाकार घेत या समूहाची स्थापना केली. मनस्वी महिला भिशी समूह सुरू केला. समूहाच्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी, (एक नोव्हेंबर २०२६) महिला शिक्षकांचा मेळावा आयोजित केला आहे. शिक्षक संघाचे राज्य नेते राजाराम वरुटे व राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. संघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा छाया देसाई, जिल्हा सरचिटणीस स्मिता डिग्रजे, कोषाध्यक्षा डॉ. नसीम मुल्ला, कार्याध्यक्षा लता नायकवडे यांची उपस्थिती असणार आहे.  याप्रसंगी भिशी व दिपावली भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे. तसेच आदर्श शिक्षिका पुरस्कार, जिल्हा परिषद आदर्श शिक्षिकांचा सत्कार, विभागीय परीक्षेतून केंद्रप्रमुखपदी निवड झालेल्या महिलांचा सत्कार, नवनियुक्त महिला शिक्षकांचा सत्कार, तालुक्यातील महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार असा संयुक्त समारंभ आयोजित केला आहे.साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes