Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपतीविनापरवाना व्यवसाय करणाऱ्या जीमवर कारवाई, लॉजिंग व्यवस्थापनला नोटीस...तर गप्प बसणार नाही, कोल्हापुरात काँग्रेसच्या नगरसेवकांचा महायुतीला इशारातेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत राजर्षी शाहू स्पोर्ट्स, ताराराणी विद्यापीठ स्पोर्ट्स विजयी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधीरेडिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुबेर यांचे निधनशिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी प्राचार्य संजय सावंतकोल्हापूर जिल्हा नेत्ररोग तज्ज्ञ संघटनेतर्फे शनिवारी विद्यापीठात रॅलीसाहित्यिक शंकर खंडू पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरात शंकरपट सांस्कृतिक कार्यक्रमडाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरव

जाहिरात

 

कोल्हापुरात सुसज्ज आर्ट गॅलरीची गरज -  मालोजीराजे छत्रपती

schedule15 Nov 26 person by visibility 11 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी:  चित्रकलेतील कलापूरची स्वतंत्र ओळख आजही कायम आहे. मात्र येथील चित्रकारांसाठी सुसज्ज आणि भव्य आर्ट गॅलरीची गरज आहे. राजर्षी शाहू स्मारक भवनातील गॅलरीला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन आणखी सुसज्ज करता येणे शक्य आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी केले. येथील चित्रकार विजय टिपुगडे यांच्या ‘तरंगायन' चित्र प्रदर्शनाच्या उदघाटनावेळी ते बोलत होते. दरम्यान, २४ नोव्हेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. प्रदर्शनात दोनशेहून अधिक कलाकृतींचा समावेश असून पहिल्याच दिवशी पंचवीस कलाकृतींचे बुकींग झाले. 
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘‘विजय टिपुगडे यांच्या कलाकृती नक्कीच कोल्हापूरच्या विविधतेने नटलेल्या निसर्गसौंदर्याची साक्ष देतात. त्या देशभर पोचल्या पाहिजेत. सर्वच कलाकारांना देशातील विविध महानगरात जावून प्रदर्शन भरवणे शक्य नाही. त्यामुळे शहरात सुसज्ज व भव्य आर्ट गॅलरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.'‘
माजी नगरसेविका स्मिता माने यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. श्रीमती इंदूबाई टिपुगडे यांचा यावेळी सत्कार झाला. शहरात अशी प्रदर्शने वारंवार व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, डॉ. प्रविण कोडोलीकर, ज्येष्ठ चित्रकार विलास बकरे, ज्येष्ठ छायाचित्रकार संजीव देवरुखकर, उदय कुंभार, माजी नगरसेविका यशोदा मोहिते, प्रकाश टिपुगडे आदी उपस्थित होते. 
प्राचार्य अजय दळवी यांनी प्रदर्शनाची संकल्पना स्पष्ट केली. केवळ चित्रकार म्हणून नव्हे, तर कलाशिक्षक, रंगावलीकार, सामाजिक कार्यकर्ता, छायाचित्रकार आणि स्तंभलेखक अशा विविध भूमिका विजय टिपुगडे यांनी नेटाने बजावल्या आहेत. तब्बल १२ वर्षांनंतर त्यांचे वैयक्तिक प्रदर्शन होत असून कोल्हापूरकरांनी आवर्जुन प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. संभाजी गंडमाळे यांनी  प्रास्ताविक केले. शुभम चेचर यांनी आभार मानले. दुर्गा आजगांवकर यांनी सूत्रसंचालन केले. राज इंचनाळकर, विजय उपाध्ये, सुदर्शन वंडकर, अजय ढवळे, शुभम कुंभार, केदार पोवार आदींनी संयोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes