महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉॅजीमधील स्कील हबमुळे कोल्हापुरात कौशल्यपूर्ण अभियंते घडतील.’असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीमध्ये सुरू होत असलेल्या स्कील हबचे उद्घाटन मंत्री पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी मंत्री पाटील व खासदार महाडिक यांचा सत्कार केला.
केंद्रीय उद्योजकता व कौशल्य विकास मंत्रालय आणि महाराष्ट सरकार यांच्या योजनांतून एकूण ४८० प्रवेश क्षमतेच्या या स्कील हबमार्फत विविध कौशल्य विकास कोर्सेस चालवले जातील, अशी माहिती एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांनी दिली. याप्रसंगी पाटील यांनी या संस्थेतील शिक्षणाचा दर्जा व सुविधांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडून माहिती घेवून समाधान व्यक्त केले. खासदार महाडिक यांनी विद्याथर्यांशी संवाद साधला. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी आभार मानले.