Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषद

जाहिरात

 

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बैठका, माजी नगरसेवकांना मंत्र्यांकडून मिळणार बूस्ट !

schedule17 Jun 25 person by visibility 466 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुंषगाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षातर्फे तीन दिवसात दोन बैठका झाल्या.  वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी, सोमवारी (१६ जून २०५) कोल्हापुरात माजी नगरसेवकांशी संवाद साधला. ‘निवडणुकीच्या तयारीला लागा, सर्वोतोपरी ताकत देतो. महायुती म्हणूनच आपणाला निवडणुका  लढवायच्या आहेत. समन्वय ठेवा ’अशा शब्दांत आश्वस्त केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत शहराध्यक्ष फरास व उत्तम कोराणे यांनी, ‘सध्या राष्ट्रवादीकडे निवडून येऊ शकतील अशा ३५ उमेदवारांची यादी तयार आहे. प्रत्येक प्रभागात एक-दोन उमेदवार आहेत.’असे सांगितले. ‘प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्या प्रक्रियेला आणखी गती येईल. राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी आम्हाला ताकत द्यावी, आम्ही जोमाने लढतो.’असे माजी नगरसेवकांनी सांगितले. यावेळी मुश्रीफांनी किमान साठ उमेदवार आपल्याकडे सक्षम हवेत. अशा उमेदवारांचा शोध घेऊन यादी तयार करा अशा सूचान त्यांनी केल्या. 

स्थायी समितीचे माजी सभापती महेश सावंत, प्रकाश गवंडी, संभाजी देवणे यांनी मनोगत व्यक्त केले. बेठकीला माजी नगरसेवक परिक्षीत पन्हाळकर, आनंदराव खेडेकर, सतीश लोळगे, रेखा आवळे, जाहिदा मुजावर, प्रकाश कुंभार, नंदकुमार गुजर, प्रकाश काटे, वसंत कोगेकर, युवराज साळोखे, विश्वास आयरेकर, सत्तार मुल्ला, महेंद्र चव्हाण, प्रमोद पोवार, अमृत सुतार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes