Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

 भाजपच्या गटनेतेपदी मुरलीधर जाधव

schedule26 Jan 26 person by visibility 33 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक मुरलीधर पांडूरंग जाधव यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाधव यांचे नाव गटनेतेपदी निश्चित केल्याचे जाहीर केले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जाधव हे प्रभाग क्रमांक सोळामधून निवडून आले आहेत. जाधव हे २००५ पासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.नगरसेवक, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापतीपदी काम केले आहे.  २०१० ते २०१५ या कालावधीतील सभागृहात त्यांनी स्थायी समिती सभापतिपदी काम केले. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे २६ नगरसेवक निवडून आले आहेत. गटनेता निवडण्यासाठी नुकतीच भाजप कार्यालयात खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव,महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्यासह नूतन नगरसेवकांची बैठक झाली होती.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes