राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी मकरंद कुलकर्णी
schedule19 Sep 25 person by visibility 17 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या प्रवक्तेपदी मकरंद कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने व पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सहकार्याने कुलकर्णी यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांचेही सहकार्य लाभले. या निवडीनंतर कुलकर्णी म्हणाले, ‘माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी देऊन नेत्यांनी दाखवलेला विश्वास आहे. हा विश्वास सार्थ करण्याचा आटोकाट प्रयत्न करेन. समाजकारण आणि राजकारण यामध्ये धर्म आणून धर्मा - धर्मांमध्ये भेद करून द्वेष पसरवण्याचे जे कार्य चालू आहे त्यापासून समाजाला परावृत्त करून समता बंधुता राखण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या पक्षाची ध्येय धोरण विचार जनते पर्यंत पोहचवणे आणि त्या द्वारे सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील यासाठी कार्य करत राहीन. पक्षाचे नेते शरद पवार यांचे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याची जनतेची समाजाभिमुख सेवा करण्याचे विचार आणि सर्व समाजाची उन्नती आणि सामाजिक आर्थिक प्रगती होईल यासाठी प्रयत्नशील असेन.’