Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रेक्टर ते राज्य आदर्श शिक्षक ! प्राचार्य दत्तात्रय घुगरेंचा प्रेरणाादायी शैक्षणिक प्रवासराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी मकरंद कुलकर्णीशरद पवारांनी टोचले साखर कारखानदारांचे कान, कारखान्यांनी कामगारांचे  ६०० कोटी थकवलेशिक्षक रवींद्र केदार, मुख्याध्यापक दत्तात्रय घुगरे यांना राज्य सरकारचे पुरस्कार ! कोल्हापूर-सांगलीतील पाच जणांचा समावेश !शहीद सीताराम  कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहातलेकीचं सोनपाऊली स्वागत ! सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना अंगठी प्रदान !!मराठी भाषा असेपर्यंत मृत्युंजय वाचकप्रिय राहिल - जिल्हाधिकारी अमोल येडगेसमाजजीवनाशी एकरुप झालेले व्यक्तिमत्व, नैतिकता सांभाळणारे राजकारणीकोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!

जाहिरात

 

रेक्टर ते राज्य आदर्श शिक्षक ! प्राचार्य दत्तात्रय घुगरेंचा प्रेरणाादायी शैक्षणिक प्रवास

schedule19 Sep 25 person by visibility 26 categoryशैक्षणिक

मला मिळालेला पुरस्कार आई-वडील, पत्नी व माझ्यासोबत  काम करणाऱ्या सहकारी मित्रांना अर्पित

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राज्य सरकाकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठीचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार या शिक्षणाक्षेत्रातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनाच प्रेरणा देईल आणि हा पुरस्कार माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व सहकारी,कर्मचारी वर्ग, माझ्या जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षणावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्र आणि त्याचबरोबर माझे अशिक्षित परंतु आशीर्वादरुपी  प्रेरणा देणारे आई-वडील आणि माझी पत्नी यांना अर्पित करतो .’अशा भावना मिणचे येथील आदर्श  विद्यानिकेतनचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय श्रीधर घुगरे यांनी व्यक्त केला.

माध्यमिक विभागात प्राचार्य घुगरे यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. घुगरे हे गेली ३१ वर्षे शिक्षण क्षेत्रात आहेत. प्रारंभीच्या काळात पन्हाळा पब्लिक स्कूलमध्ये ते रेक्टर होते. संजीवन स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर २००१ मध्ये मिणचे येथे गावी परतले आणि स्वत:ची संस्था सुरू केली. आदर्श शिक्षण संस्थेची स्थापना केली. शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील विविध संघटने महत्वाच्या पदावर काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघात ते सहसचिव होते. मुख्याध्यापक राज्य महामंडळात उपाध्यक्षपदी योगदान दिले. हँडबॉल, तलवारबाजीसह पाच क्रीडा संघटनेशी ते निगडीत आहेत.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी घुगरे यांनी नेहमीच प्राधान्य दिले. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबतच कला, क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थी चमकावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. संस्कारक्षम शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांचे एकाच वेळी संविधान वाचन, सलग सात दिवस शिवचरित्र वाचन, शिवजयंतीला सुर्यनमस्कारचा उपक्रम असे विविध कार्यक्रमांचे रेकॉर्ड झाले आहेत. त्याच्या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. मुख्यमत्री माजी शाळा-सुंदर शाळेतही त्यांच्या शाळेने बाजी मारली आहे. डिजीटल माध्यमाचा वापर, नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्थेचे (कोजिमाशि) माजी चेअरमन व संचालक आहेत.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे १८ सप्टेंबर २०२५ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कारानंतर प्राचार्य घुगरे म्हणाले, ‘समाजातील प्रत्येक शिक्षकाला आपण शैक्षणिक क्षेत्रातील करीत असलेल्या कामाचं कौतुक व्हावे असं वाटत असते आणि अशा पुरस्काराने शाबासकीची थाप जर पाठीवर मिळाली तर पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची उमेद शिक्षकाला मिळत असते. माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला आयुष्यभर शिक्षक म्हणून पवित्र काम करत असताना अतिशय आनंद मिळाला आहेच पण आज महाराष्ट्र सरकारने माझा पुरस्कार देऊन जो गौरव केला आहे त्यामुळे समाजातील सर्व शिक्षकांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल आणि अजून जोमाने  हे शैक्षणिक कार्य करतील अशी मला आशा वाटते. ’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes