Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हद्दवाढ दृष्टीक्षेपात,  तत्वत: मान्यता-आमदार राजेश क्षीरसागरमाजी नगरसेवक रमेश पुरेकर शिवसेनेतदुरावलेल्या नगरसेवकांच्या घरवापसीसाठी राष्ट्रवादीची फिल्डींग ! भैय्या माने, युवराज पाटलांच्यावर जबाबदारी !!महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या बैठका, माजी नगरसेवकांना मंत्र्यांकडून मिळणार बूस्ट !कॅरम बोर्डवर रंगला नेत्यांचा खेळ ! राजकारणात नवा दोस्ताना !कर्मचारी पतसंस्थेतर्फे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफांचा सत्कारकोरगांवकर हायस्कूलमध्ये सवाद्य मिरवणुकीबरोबरच पुस्तक वाटपकंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी विजयनगरममध्ये मोटारसायकल रॅली जरगनगर विद्यामंदिरात अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत, अरुंधती महाडिकांच्या हस्ते शालेय साहित्य वाटपकेंद्र शाळा पाचगावमध्ये विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक

जाहिरात

 

महायुतीचा कारभार म्हणजे पैसा लुटा अन् स्वत:चे घर भरा –आमदार सतेज पाटील यांचा हल्लाबोल

schedule09 Nov 24 person by visibility 206 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सरकारी निधीतून पैसा लुटा आणि स्वत:ची घरे भरा असाच कारभार महायुतीचा आहे. सध्याच्या महायुतीच्या सरकारच्या कामामुळे महाराष्ट्र दहा वर्षे पिछाडीवर पडला. अशा भ्रष्ट महायुतीचा विधानसभा निवडणुकीत पराभव करा”असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी केले.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ मिरजकर तिकटी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. खासदार शाहू महाराज छत्रपती हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेला आमदार जयंत आसगांवकर, आमदार हसन मौलाना, काँग्रेस निरिक्षक सुखवंतसिंह ब्रार, श्रीमती सरोज एन. डी. पाटील, राष्ट् सेवा दलाचे भरत लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  या सभेत बोलताना सर्वच नेते व पदाधिकाऱ्यांनी, ‘ राजेश लाटकर यांची उमेदवारी ही सच्चा कार्यकर्त्याची आहे. या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवून इतिहास घडवू या ’असे आवाहन केले. तसेच सभेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व महायुतीचे उत्तरमधील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली.

 ‘महायुती सरकारकडून विकासकामांच्या निधीवरुन जनतेची दिशाभूल केली जात आहे. समाजात तेढ निर्माण केली जात आहे. ४५०० कोटी रुपयांचा निधी कोठे गेला ? शंभर कोटी रुपयांची रस्ते शोधावे लागत आहेत. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे.राजेश लाटकर सारख्या  कार्यकर्ता नगरसेवकाला आमदार करेल, असा विश्वास आहे. ’असे आमदार पाटील यांनी नमूद केले. कोल्हापूर उत्तरवरील घडामोडीवर भाष्य करताना त्यांनी ‘वक्त का खेल था जो बित गया, अब हम खेलेंगे वक्त देखता रहेगा’ हा शेर ऐकविला.

खासदार शाहू महाराज म्हणाले, ‘महाविकास आघाडी ही जनतेच्या हितासाठी काम करत आहे. राजेश लाटकर सारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली, याचा आनंद आहे. सारे जण त्यांच्या पाठीशी राहू या.’श्रीमती सरोज पाटील म्हणाल्या, ‘ विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. भाजप म्हणजे विषवल्ली आहे. भाजपवाल्याच्या भूलथापांना बळी पडू नका. तरुण मुले त्यांना फसणार नाहीत यासंबंधी खबरदारी घ्या.’  याप्रसंगी शिवसेना उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक भारती पोवार, सतीश कांबळे, आदींची भाषणे झाली. अनेकांनी भाषणातून क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीका केली.

…………..

सहा महिन्यात रस्ते, कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावणार

उमेदवार राजेश लाटकर म्हणाले, ‘कोल्हापूर शहरातील प्रश्नांची मला जाण आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यात शहरातील रस्ते आणि कचरा व्यवस्थापनचा प्रश्न मार्गी लावणार आहे. मी, कोणालाही त्रास देणार नाही. भाजपवाले लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही कारभार करत आहेत. पाच वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत. निवडून आल्यानंतरही माझ्या संपत्ती व मालमत्तेत दहा टक्केच वाढ झालेली दिसेल.विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला मी तयार आहे. अपक्ष म्हणून  निवडून आल्यानंतर मी कोठेही जाणार नाही. गद्दारी करणार नाही’

………………………………………

सभेला काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, काँग्रेसचे शहरप्रमुख सचिन चव्हाण,  दौलत देसाई, माजी नगरसेवक संजय मोहिते, बाबूराव कदम, व्यंकाप्पा भोसले दिलीप पवार, अतुल दिघे, शिवाजीराव परुळेकर, दगडू भास्कर, आपचे संदीप देसाई, बाबा इंदूलकर,बबनराव रानगे,माजी  नगरसेविका पद्मा तिवले, प्रतिज्ञा उत्तुरे, पूजा नाईकनवरे आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes