चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे
schedule15 Jun 26 person by visibility 94 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले व उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, गायक आनंद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. महामंडळाची 2026 - 2031 या कालावधीसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलने एकहाती सत्ता मिळवली. महामंडळाच्या 17 जणांच्या कार्यकारिणीत सोळा संचालक समर्थ पॅनेलचे आहेत.
नूतन पदाधिकारी निवडीसाठी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी 15 जून 2026 रोजी कोल्हापुरात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके या अध्यक्षस्थानी होत्या. महामंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदी सुशांत शेलार तर खजिनदारपदी सुनील महाजन यांची निवड करण्यात आली. सहखजिनदारपदाची जबाबदारी शरद चव्हाण यांच्याकडे आहे. सहकार्यवापदी दीपक कदम व प्रवीण पाटील यांची निवड झाली
या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष राजेभोसले यांनी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या नवीन योजनांची माहिती दिली. चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची 23 जून रोजी पुणे येथे पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत तीन वर्ष ब वर्ग सभासद असलेल्या सभासदांना अ वर्गात समावेश करण्याचा निर्णय होईल. तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे पेन्शन यासंदर्भातील निर्णय घेतले जातील. पहिले मराठी चित्रपट संमेलन भरविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे त्या संदर्भातही पुणे येथील बैठकीत निर्णय होणार आहे. याशिवाय अभिनेते विक्रम गोखले यांनी जी दोन एकर जागा दिली आहे त्या ठिकाणी वृद्ध कलावंतासाठी वृद्धाश्रम उभारणीचा हे प्रस्ताव आहे या संदर्भातील कार्यकर्त्यांनी ज्या बैठकीत निर्णय घेतला जाईल
असे त्यांनी सांगितले. या बैठकीला संचालक अजित शिरोळे राज काजी, सुभाष नकाशे , चैत्राली डोंगरे , रवींद्र गावडे , गणेश गारगोटे, विकास तोरणे आदी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीला विरोधी गटाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगावकर या अनुपस्थित राहिल्या.