Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पाणीपट्टी दरवाढीला महापालिकेच्या सभेत मंजुरी, दरवाढीतून मिळालेल्या रकमेचा विनियोग पाणी पुरवठा योजनेसाठीचजिल्हाधिकारी, सीईओंच्या उपस्थितीत जल जीवन मिशन, घनकचरा - सांडपाणी व्यवस्थापनची आढावा बेठकमहापालिकेच्या शाळेतील फलकावर शिक्षकांच्या जातीचा उल्लेख ! नगरसेवकांनी उघडकीस आणला प्रकार !!उद्योगविश्वाच्या बदलत्या गरजा ओळखा; टीसीएस उपाध्यक्षांचा टीकेआयईटी विद्यार्थ्यांना मंत्रमहापालिका शाळांच्या सेवा - सुविधेकडे नेहा तेंडुलकरने वेधले सभागृहाचे लक्षडॉ. प्रभाकर कोरे यांना घाळी समाजभूषण पुरस्कार, २४ ऑगस्टला वितरणकोल्हापूर प्रेस फोटोग्राफर क्लबचे पुरस्कार जाहीर !  अनिल वेल्हाळ, संजीव भोर यांना पुरस्कार ! !ताराबाई पार्कातील गोकुळ शॉपीला नवा लूक, दुधासह दुग्धजन्य पदार्थ उपलब्धहॉस्पिटल चालविण्याचा परवाना नाही, मात्र चक्क सहा वर्षे प्रॅक्टिस ! एक हॉस्पिटल सील, एका डॉक्टरांना आर्थिक दंड ! !प्रत्येक नागरिकाने कायद्याबाबत सजग असावे -: पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड

जाहिरात

 

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभाग

schedule16 Jun 26 person by visibility 249 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धाना सुरुवात झाली. अंबाई डिफेन्स सोसायटी येथील बॅडमिंटन कोर्टवर द कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष वा उद्योगपती सतीश घाटगे यांच्या हस्ते स्पर्धांचं उदघाट्न झाले. सलग दुसऱ्या वर्षी महादेवराव महाडिक फाउंडेशनने या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत. या स्पर्धेत सर्व वयोगटात एकूण २६६ स्पर्धक सहभागी झाले आहेत.

उदघाट्न समारंभावेळी द कोल्हापूर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे उपाध्यक्ष विनोद भोसले, साईदास खणगावे अक्षय मनवाडकर, सुमित चौगुले, वर्षा नाडगोंडे, अरुणा रसाळ, तन्मय करमरकर, केदार नाडगोंडे, जगदीश काणे, सिद्धार्थ नागावकर, विक्रांत सोहोनी व निशांत पाटील उपस्थित होते.

स्पर्धेच्या पहिल्या दिवसातील सामन्यांचे निकल पुढीलप्रमाणे :- अकरा वर्षाखालील मुले  कबीर होगडे विजयी विरुद्ध वीर गुरव 16 -14, 15 -12, अत्रेय पुजारी विजयी विरुद्ध कार्तिक जैन 15 -6, 15- 8, देवांश मुरताळे विजयविरुद्ध शार्विल चिले 15 -6 15 -7, शिवांश कारंडे विजयविरुद्ध ऋतुराज घुटे पाटील 15 -5 15 -8.  तेरा वर्षाखालील मुले आतिश पाटील विजयी विरुद्ध हर्षवर्धन घुगरे 15 -12  15- 11, ज्योती आदित्य चव्हाण विजय विरुद्ध धृकुंडले 15- 11 ,15- 10, ओम इंगळे विजयविरुद्ध वर्धन भोई 15- 10  11- 15 ,15 -10 , अंवित कर्णिक विजयविरुद्ध अर्जुन सोवणी 15 -11 ,15 -12.  तेरा वर्षाखालील मुली नव्या सोलापुरे विजयविरुद्ध पृथा गुरव 7-15 , 16- 14, 15 11, कशिश अंगडी विजयविरुद्ध स्वरावी वडिंगे 15 -10 ,15- 11, मधुरा हर्षे विजयविरुद्ध देवयानी खोपकर 15 -4 ,15- 12,  गार्गी पाटील विजय विरुद्ध स्वरागिनी माने 15-8 ,15 -12. पंधरा वर्षाखालील मुले  तन्मय पाटील विजय विरुद्ध विष्णू लोकरे 15- 13 ,16- 18 ,15- 13 , धीर झवर विजयी विरुद्ध ु ध्रुव घोरपडे 15 -9 ,15 -11.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes