लॉंग लाईफ मोती महल आरपीएलचा विजेता ! एमडब्ल्यूजी सुपर किंग्सला उपविजेतेपद !!
schedule21 Apr 25 person by visibility 62 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लाँग लाईफ मोतीमहल संघाने आरपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले . तर एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघ उपविजेता ठरला.रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्यावतीने मेरी वेदर मैदानावर स्पर्धा झाली.
लॉंग लाइफ मोती महल संघाचा कर्णधार सचिन गाडगीळ मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तर याच संघाचा राकेश घाणेकर उत्कृष्ट गोलंदाज ठरला.
अंतिम सामन्यात लॉंग लाइफ मोती महल संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १० षटकांमध्ये १०१ धावा केल्या. कर्णधार सचिन गाडगीळने १५ चेंडूत चार षटकारांसह ३१ धावा तर सचिन परांजपे यांनी १२ धावा केल्या.
एमडब्ल्यूजी सुपरकिंग्स संघाकडून डॉ. समीर कोतवाल, दर्शन सावंत यांनी प्रत्येकी दोन तर रवी मायदेव , रवी खोत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
प्रत्युत्तरा दाखल खेळताना एमडब्ल्यूजी सुपरकिंग्सचे खेळाडू ठराविक अंतराने बाद होत गेले. सचिन पाटील २६, कर्णधार नामदेव गुरव १४, प्रसन्न सरदेसाई ११ यांनी दुहेरी धावसंख्या उभारली. पण त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या संघाला निर्धारित १० षटकात ५७ अशी धावसंख्या उभा करता आली.
लॉंग लाइफ मोतीमहल कडून राकेश घाणेकर दोन तर प्रवीण काजवे आणि आदर्श शेट्टी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील, क्लबचे प्रेसिडेंट संजय भगत, इव्हेंट चेअरमन रवी मायदेव, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सेक्रेटरी रवी खोत, ok लॉंग लाइफइव्हेंट को- चेअरमन प्राचार्य डॉ. महादेव नरके , रविराज शिंदे, संग्राम शेवरे, निलेश पाटील,दाजीबा पाटील,अभिजित भोसले,राजेश आडके,संजय कदम, अविनाश चिकनिस, संदीप साळोखे , डॉ.अभिजित माने उपस्थित होते.