Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भिशीचे रुपांतर पतसंस्थेत…आता शंभर कोटीच्या ठेवीकडे वाटचालचार्टर्ड अकौंटंट्स  कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी सीए आशिष सेवेकरी, उपाध्यक्षपदी अलोक शहा कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षांची निवड सतरा मार्चला ! पंचायत समिती सभापती दहा मार्चला निवडणार!!शिक्षण घेणं म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणं नव्हे तर माणूस म्हणून जगणे महत्त्वाचे - कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव नूतन मराठी विद्यालय हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहातकृष्णराज महाडिकांचे  रविवारी कोल्हापुरात होणार  जल्लोषी स्वागतडीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिकअक्षरांच्या दुनियेतील ‘मनोहर’ प्रवास ! महापालिका शाळेत ‘लेखक आपल्या भेटीला’ सोहळा!!महापौरांनी केली पुतळयाची स्वच्छता, उपमहापौरांकडून धूर फवारणी ! आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली साफसफाई! !न्यू कॉलेज, सेवकांची पतसंस्था चेअरमनपदी पी. डी. चौगले, व्हाइस चेअरमनपदी एस. पी. माने

जाहिरात

 

भिशीचे रुपांतर पतसंस्थेत…आता शंभर कोटीच्या ठेवीकडे वाटचाल

schedule28 Feb 26 person by visibility 18 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पाटोळेवाडी हा परिसर कष्टकरी समाजाचा. लहानसहान व्यावसायिकांची संख्या मोठी. या घटकाची आर्थिक गरज भागावी म्हणून १९७० मध्ये पाटोळेवाडी तालीम येथे भिशीची स्थापना झाली. व्यवहार चोख, विश्वासार्ह कारभार. यामुळे नागरिकांचा विश्वास वाढत गेला. मोजक्या लोकांच्या सहभागातून सुरू झालेल्या या भिशीचे पुढे शेकडो सभासद झाले. १९८८ मध्ये तर या भिशीची उलाढाल ५० लाखापर्यंत पोहोचली. सभासदांना भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रमाला लोकनेते व दिवंग खासदार सदाशिवराव मंडलिक उपस्थित होते. त्यांनी या भिशी मंडळाचे काम पाहून इतकी उलाढाल पतसंस्था सुरू करण्याची सूचना केली. आणि पतसंस्था स्थापनेसाठी सहकार्याची ग्वाही दिली. १९८९ मध्ये भिशीचे रुपांतर श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेत झाले. गेल्या साडे तीन दशकाच्या कालावधीत पतसंस्थेने ग्राहक व सभासदांचा विश्वास संपादन करत कोल्हापुरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या संस्था १०० कोटीच्या ठेवीकडे वाटचाल करत आहे.

रुईकर कॉलनी येथे पतसंस्थेचे प्रधान कार्यालय आहेत. शहरात पाच शाखा आहेत. प्रधान कार्यालय व पाटोळेवाडी शाखेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थेचे संस्थापक राजाराम पाटोळे यांनी संस्थेच्या स्थापनेचा इतिहास उलगडला. ‘पतसंस्थेने सामान्य लोकांना आधार देण्याचे काम केले आहे. महिलांना स्वावलंबन व स्वतंत्र लघुउद्योग उभारण्यासाठी महिला बचत गटांना अर्थसहाय केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून ४५८ इतक्या महिलांना तीन कोटी ३० लाख ९० हजार इतके कर्ज वाटप केले. विशेष म्हणजे, या कर्जाची शंभर टक्के वसुली झाली आहे. सभासदांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास संस्थेमार्फत पाच हजार रुपयांची ठेव पावती केली जाते. सभासदाचा मृत्यू झाल्यास संस्थेमार्फत मृत्यूजंय निधीतून वीस हजार रुपयांची मदत केली जाते.’ असे संस्थापक राजाराम पाटोळे यांनी सांगितले.

संस्थेच्या कामकाजाविषयी चेअरमन किरण पाटोळे म्हणाले, ‘पतसंस्थेच्या सर्व शाखा ऑनलाइन प्रणाली, कोअर बँकिग सेवेने सज्ज आहेत. संस्थेच्या ठेवी ९४ कोटी ३४ लाख ६६ हजार ५०७ रुपये इतक्या आहेत. कर्ज वाटप ६७ कोटी २५ लाख ३३ हजार  २०२ रुपये इतके आहे. भागभांडवल तीन कोटी ९३ लाख ८१ हजार ४५० रुपये इतके आहे. खेळते भांडवल ११४ कोटी रुपये आहे.  तर गुंतवणूक ४० कोटी ९७ लाख २३ हजार ५२५ रुपये इतके आहे. सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप केले जाते. ’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes