Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खालील दडकृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नयेकॅम्पस टू कार्पोरेट...बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटमध्ये मायक्रोसॉफ्टकडून मार्गदर्शनसन्मानाच्या दिनीच शिक्षक रस्त्यावर !  जुनी पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !!गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

कृष्णराज महाडिकांनी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावेत, मनसेच्या नादाला लागू नये

schedule05 Sep 26 person by visibility 2 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. आंदोलनाच्या नावाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नादाला  लागू नये. अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असे मनसे युवा सेनेचे अभिजीत राऊत व अजिंक्य शिंदे यांनी सांगितले. मुंबईतील मनसे व भाजप युवा मोर्चातील राडयानंतर महाडिक यांनी मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून चोर असा उल्लेख केला होता. त्यावरही मनसे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाडिक यांना प्रश्न केले. ‘धनंजय महाडिक हे लोकसभा निवडणुकीत उमेदवार असताना तसेच अमल महाडिक हे विधानसभा निवडणूक लढवित असताना मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांना पाठिंबा दिला होता, प्रचार केला होता. तेव्हा मनसे कार्यकर्ते चोर आहेत हे दिसले नाही का ? असा सवाल कार्यकर्त्यांनी केला. मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यावर टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल असेही ते म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes