Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शनमहिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकरअवनितर्फे शुक्रवारी शिक्षण हक्क  परिषदक्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांना अभिवादनन्यू कॉलेजमध्ये साकारला आधुनिक ई कंटेंट डेव्हलपमेंट स्टुडिओडीवाय पाटील कृषी अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला कृषी शास्त्रज्ञ

जाहिरात

 

कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांच्यावर कोथरुडकरांचे विशेष प्रेम ! दोनदा आमदार केले, यंदा विक्रमी मताधिक्क्य !!

schedule24 Nov 24 person by visibility 219 categoryजिल्हा परिषद

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर : चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते. पक्ष जो जबाबदारी देईल ते प्रामाणिकपणाने पार पाडण्याचा त्यांचा खाक्या. ‘मी कोरं पाकिट आहे, पक्ष त्यावर जो पत्ता टाकेल तिथं जाऊन मी काम करणार.’ही त्यांच्या कामाची पद्धत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सक्रिय असलेल्या पाटील यांनी गेल्या काही वर्षात भाजपमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले. जिथं संधी मिळेल तिथं समरस होऊन काम करण्याची वृत्ती. २०१९ मधील निवडणुकीत पक्षाने त्यांना पुणे जिल्ह्यातील कोथरुड मतदारसंघात उमेदवारी दिली. त्यांनी पाच वर्षे मतदारसंघासाठी प्रामाणिकपणाने काम केले. बाहेरील उमेदवार हा शिक्का पुसून काढला. पुणेकरांच्या विश्वासाला, प्रेमाला शत-प्रतिशत उतरले. यंदा कोथरुडकरांनी त्यांच्यावर विशेष प्रेम दाखवित विधानसभा निवडणुकीत उच्चांकी मताधिक्क्यांनी विजयी केले.

कोथरुड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील हे एक लाख ११  हजार ७४८ मताधिक्क्यांनी विजयी झाले. या मतदारसंघात तिरंगी लढत होती. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून किशोर शिंदे रिंगणात होते. मात्र येथील निवडणूक ही एकतर्फी झाली. मंत्री पाटील यांना एक लाख ५९ हजार २३४ मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजीं आमदार मोकाटे यांना ४७ हजार १९३ मते तर मनसेचे उमेदवार शिंदे यांना १८ हजार १०५ मतावर समाधान मानावे लागले.  पाटील यांना एक लाखाहून अधिक मताधिक्क्य मिळाले. कोथरुडकरांनी यंदा पाटील यांच्या पारडयात भरभरुन मतांचे दान केले. २०१९ मधील निवडणुकीत पाटील यांचे मताधिक्क्य २५ हजाराचे होते. मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांना या मतदारसंघातून ७४ हजार ४०० इतके मताधिक्क्य होते.त्याहून अधिक मताधिक्क्य पाटील यांना मिळाले.

गिरणी कामगाराराचा हा मुलगा. पुढे अभाविपमध्ये सक्रिय झाला. संघटनात्मक पातळीवर काम केले. ते पूर्णवेळ प्रचारक होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत काम केले. २००५ मध्ये ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. २००८ मध्ये पुणे पदवीधर  पदवीधर मतदारसंघातून  आमदार झाले. दोन टर्म त्यांनी पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. २०१४ ते २०१९ या कालावधीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात तब्बल सोळा खात्याचा कारभार पाटील यांच्याकडे होता. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांचा भाजप प्रवेश घडवून आणला. पक्ष वाढीसाठी काम केले. कार्यकर्त्यांचे आधारवड ठरले. ते, विविध सेवाभावी संस्थांना आश्रयदाते आहेत. एखाद्यातील चांगले गुण हेरायचे आणि चांगल्या कामासाठी प्रोत्साहित करायचे हा त्यांचे स्वभाववैशिष्ट्ये. प्रसिद्धीपासून लांब राहत त्यांनी अनेक खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना मदत केली. 

२०१९ मधील विधानसभा निवडणूक जाहीर झाली. चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उमेदवारी जाहीर झाली. या मतदारसंघात भाजपाला मानणारा मतदार  वर्ग मोठा. कार्यकर्त्यांचे नेटवर्क. संघटनात्मक कामाचा अनुभव असणाऱ्या पाटील यांनी कोथरुडमध्ये प्रत्येकाशी जुळवून घेतले. निवडणूक जिंकली. पुढे महायुतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीपद मिळाले. मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कोथरुडवरील लक्ष कमी केले नाही. मतदारसंघात त्यांनी विविध उपक्रम राबविले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ व सुरक्षित कोथरूड अभियान राबवले. फिरते ग्रंथालयसारखा वाचन संस्कृतीला बळ देणारा उपक्रम सुरू केला. बाहेरील उमेदवार हा शिक्का पुसून काढत ते कोथरुडमधील नागरिकांना आपला माणूस वाटले.

.............................

अत्यंत भावनिक अन् आनंददायी क्षण!

‘‘ कोथरूडमधील मायबाप जनतेने एक लाख बारा हजार ४१ अशा विक्रमी मताधिक्याने आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार ! माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवणाऱ्या कोथरूडकरांचा मी आजन्म ऋणी आहे. सर्वांनी दिलेलं प्रेम, विश्वास यामुळे मला आणखी बळ मिळालं आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमातून या जन्मात तरी मी उतराई होऊ शकणार नाही. माझे आणि कोथरूडकरांचे जन्मो-जन्मीचे नाते आहे, हेच आजच्या यशातून अधोरेखित होते. मला मिळालेले कोथरूडकरांचे प्रेम ही माझी पुण्याई आणि हीच माझी खरी श्रीमंतीही आहे. पंतप्रधान नरेेद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेेद्र  फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो.”

- चंद्रकांत पाटील, आमदार कोथरुड विधानसभा मतदारसंघ

 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes