सकल मराठा समाजातर्फे सोमवारी जवाब दो आंदोलन
schedule03 Sep 23 person by visibility 1164 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जालना येथे शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा समाजातील कार्यकर्त्यावर झालेल्या बेछूट लाठीमाराचा जाब विचारण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सोमवारी चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता दसरा चौक येथे जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी केले आहे.