Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभारआंतरभारती शिक्षण मंडळ करणार महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभागफेरीवाल्यांचा सोमवारी महापालिकेवर मोर्चाकर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी विद्यापीठ प्रशासनासोबत कास्ट्राइब संघटनेची बैठकसर्व स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळावा; राज्यस्तरीय समन्वय प्राधिकरण स्थापण्याची मागणी आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !

जाहिरात

 

आंतरभारती शिक्षण मंडळ करणार महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर 

schedule19 Jul 26 person by visibility 85 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक विचारांचा जागर आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्यावतीने करण्यात येणार आहे. संस्थेमार्फत वर्षभर व्याख्यान, चर्चासत्रे, विविध स्पर्धा होणार आहेत. अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा आणि आंतरभारती शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २५ जुलै रोजी संस्थेच्यावतीने या उपक्रमाचा भाग म्हणून सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूलच्या सभागृहामध्ये सकाळी ११ ते १ या वेळेत शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आंतर भारती शिक्षण मंडळाचे माजी सचिव आणि ज्येष्ठ संचालक एम् .एस्. पाटोळे यांनी दिली.  कार्यशाळेत  अध्यापक सभेचे कार्याध्यक्ष आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. शरद जावडेकर आपले विचारपुष्प गुंफणार आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या कार्यशाळेसाठी आंतरभारती विचाराच्या संलग्नित शाळांमधील शिक्षकांचा समावेश असणार आहे . एकूणच आंतरभारती विचारांच्या सर्वच शाळांमध्ये व्याख्याने, चचासत्रे, निबंध स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा, मेळावे याद्वारे खऱ्या अर्थाने शैक्षणिक चळवळ विचारांचे मूर्त स्वरूप अंगिकारेल. यासाठी महात्मा फुले यांचे विचार पुन्हा पुन्हा समाजासमोर शिक्षकांच्या माध्यमातून पोहचवण्यासाठी आंतरभारतीने कंबर कसली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. मांगल्य हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीस मुख्याध्यापक संजय सौंदलगे, मारुती शिणगारे, राजाराम संकपाळ, वृषाली कुलकर्णी यांचेसह रणधीर मिरजकर, इंद्रायणी पाटील, बाबासो डोणे, हेमलता पाटील, नेहा कटके, जयवंत साखरे आदी मान्यवर उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes