Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डबडबलेले डोळे…गहिवरलेली मने...शोकसभेत उलगडला लाटकर काकांच्या आठवणींचा पट वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभारआंतरभारती शिक्षण मंडळ करणार महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभागफेरीवाल्यांचा सोमवारी महापालिकेवर मोर्चाकर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी विद्यापीठ प्रशासनासोबत कास्ट्राइब संघटनेची बैठकसर्व स्वयंसेवी संस्थांना सीएसआर निधी मिळावा; राज्यस्तरीय समन्वय प्राधिकरण स्थापण्याची मागणी आंदोलनावरुन आंदोलन, गोकुळ आवारातून कर्मचाऱ्यांनी केले वांगचूकांचे समर्थन,  भाजपाचा जोरदार आक्षेपशक्तीपीठ रद्द करा, अन्यथा जनताच सरकारचा शक्तीपात करेल ! पंढरपुरात संघर्ष समितीतर्फे सद्बुद्धी दिंडी ! !कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावले

जाहिरात

 

राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या कलाकारांचा सहभाग

schedule19 Jul 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी, नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात, महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या कलाकारांना निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच २६ जानेवारी रोजी दिल्लीतील विजयपथावरील मिरवणुकीत चित्ररथात सहभागी असलेल्या कलाकारांचाही सत्कार केला. नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे कलाकार यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथ सोहळयात सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या चित्ररथाला यंदा पहिला क्रमांक मिळाला. या चित्ररथासोबत सादर होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात, कोल्हापूरच्या श्रीजा फाऊंडेशनच्या कलाकारांनी लेझीम नृत्य सादर केले होते. खासदार महाडिक यांच्या हस्ते आज या कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. दुसरीकडे श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांना येत्या १५ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे होणार्‍या मुख्य शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपारिक कला सादर करण्यासाठी निमंत्रित केले आहे. त्याबद्दलही या कलाकारांचे  खासदारांनी अभिनंदन केले. यावेळी सागर बगाडे यांनी खासदार महाडिक यांच्याकडून कोल्हापूरच्या कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ मिळत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी श्रीजा लोकसंस्कृती फौंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष शेखर वळीवडेकर, समन्वयक निरांक घाडगे, क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes