वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड
schedule19 Nov 26 person by visibility 9 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: येथील हॉटेल व्यावसायिक मारुती माने व माजी नगरसेविका स्मिता माने यांचे चिरंजीव मंथन माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबविला. वाढदिनी होणाऱ्या अनाठायी खर्चाला फाटा देत मंथन माने यांनी गरजू व गरीब लोकांना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार तावडे हॉटेलजवळील वीटभट्टीवरील कामगार नवीन कपडे, ब्लँकेट दिले. कामगारांच्या मुलांना मिठाई बॉक्स वाटप केले. लहान मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. या उपक्रमाविषयी माजी नगरसेविका स्मिता माने म्हणाल्या, ‘वाढदिनी सामाजिक जाणीव ठेवून माझ्या मुलाने, वीटभटटीवरील कामगार व त्यांच्या मुलांना मदत केली. असा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल माझ्या मुलाचा अभिमान वाटतो. इतरांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची, माणूस म्हणून जगण्याची ही प्रक्रिया मनाला खूप समाधान देणारी आहे.’