Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नगरविकासच्या सचिवांसाबत क्रिडाई पदाधिकाऱ्यांची २१ ऑगस्टनंतर मंत्रालयात बैठक-खासदार श्रीकांत शिंदेअमका आला, तमका गेल्याचे मला टेन्शन नाही, सतेज पाटील म्हणजे माणसं तयार करण्याची फॅक्टरी विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची घंटी वाजली ?नरके, क्षीरसागरांची सतेज पाटलांच्यावर टीकाजिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर - इचलकरंजीचा महापौर शिवसेनेचा करूया : कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनमहापालिकेतील लाचखोरी, ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या नावासहित टक्केवारीची रक्कम जाहीर  !!सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविलेसोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभहॉटेल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटीलराधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले

जाहिरात

 

अमका आला, तमका गेल्याचे मला टेन्शन नाही, सतेज पाटील म्हणजे माणसं तयार करण्याची फॅक्टरी

schedule26 Jul 25 person by visibility 175 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘काँग्रेस पक्षाच्या वाटचालीत अनेक चढ –उतार आले. अनेकजण आले, अनेकजण गेले. पण काँग्रेसची विचारधारा कधी संपली नाही. राजकारणात माणसं येतात, माणसं जातात. पण सतेज पाटील हा माणसं तयार करणारा फॅक्टरी आहे. मी सदैव लोकांसोबत आहे, यामुळे अमका आला, तमका गेला याचे मला कसलेही टेन्शन नाही. मेळाव्याला झालेली गर्दी पाहून मी धन्य झालो. कार्यकर्त्यांची साथ आणि लोकांचा विश्वास यामुळे कोणत्याही संघर्षाला मी तयार आहे.  कोण बरोबर आले, कोण नाही याचा विचार करत बसायचे नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा जीवाभावाची माणसं हीच आपली संपत्ती आहे. महापालिका निवडणूक आम्ही निश्चितपणे जिंकणार, विरोधक हरणार. येत्या पाच महिन्यासाठी आता एकच मिशन कोल्हापूर महापालिका-काँग्रेसचा महापौर.’अशा शब्दांत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी जणू रणशिंगचे फुंकले. सुमारे अर्धा तासाच्या तडाखेबाज भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ऊर्जा चेतविली.

 आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी ‘निर्धार मेळावा’ आयोजित केला होता. खासदार शाहू महाराज छत्रपती मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, बाळासाहेब सरनाईक, सरला पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी महापौर महादेवराव आडगुळे, मारुतराव कातवरे, भिमराव पोवार, जयश्री सोनवणे, वंदना बुचडे, अश्विनी रामाणे, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेविका भारती पोवार,  माणिक मंडलिक, श्रीकांत बनछोडे, युवा नेते दौलत देसाई, तौफिक मुलाणी, दुर्वास कदम, वैभवी जरग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागातील प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मेळाव्याला तुडूंब गर्दी केली होती. या मेळाव्याच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन घडविले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीनंतर पक्ष पुन्हा एकसंध असल्याचे दाखवून दिले.

 ‘काहींनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. अजून कुणाला काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी आता घ्यावा. मात्र महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीची धामधूम सुरू झाली. त्यावेळी जर कोणी गडबड केली तर त्यांच्या वॉर्डात माझा मुक्काम असेल. तो माझ्या टार्गेटवर असेल.  निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम होणार.’ असा दमही आमदार पाटील यांनी भरला. ‘काही चुकत असेल तर मला सांगा, चुका दुरुस्त करुन पुढे जाण्याची माझी भूमिका आहे. मात्र महायुतीच्या विरोधात ताकतीने लढू या. शिवछत्रपती, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपणाला पुढे चालायचे आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दहा लाखाहून अधिक मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. निवडणुका जाहीर झाल्या की माझ्याबद्दल अफवा पसरवतील. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. हा सतेज पाटील आयुष्यभर काँग्रेस सोबत असेल. महापालिका निवडणुकीत जनतेची मते जाणून जाहीरनामा तयार करू. शहर विकासासोबतच वॉर्डाचाही जाहीरनामा प्रसिद्ध करू ’असा विश्वासही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

                   पाशवी बहुमतामुळे महायुतीला सत्तेचा माज.राज्याची आर्थिक शिस्त बिघडली

राज्यातील महायुतीच्या सरकारवर टीकेची झोड उठवित सतेज पाटील म्हणाले,‘ महायुतीचे सरकार हे चोरुन सत्तेवर आलेले आहे. सरकारमधील तीनही पक्षात एकवाक्यता नाही. तीन चाकाचे सरकार म्हणतात. एकजण पुढे जातो, दुसरा डावीकडे तर तिसरा पक्ष उजवीकडेकोणाचा पायपोस कोणाला नाही. असले सरकार गेल्या वीस वर्षात पाहिले नाही. निवडणुकीवर डोळा ठेवून महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहिण योजना आणली. निकालानंतर अनेक बहिणींना या योजनेपासून वंचित ठेवले. योजनेचे नियम बदलले. निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणीला विधानसभेच्या निकालानंतर मात्र सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. पाशवी बहुमतामुळे महायुती सरकारला सत्तेचा माज आला आहे.  रेटून कामकाज होत आहे. राज्याची आर्थिक शिस्त बिघडली आहे.  तरुण कंत्राटदार आत्महत्या करत आहेत. सरकार कर्जात आहे. ८६ हजार कोटीच्या शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास का आणि कोणासाठी ? विकासकामांसाठी सरकारकडे पैसा नाही. महागाई वाढत आहे. इंधनाचे दर भडकत आहेत. जनसुरक्षा सारखा जाचक कायदा लागू केला.  दहशतीचे वातावरण आहे. हे चित्र लोकशाहीसाठी घातक आहे. ’

काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सत्ताधारी भाजपच्या विरोधात देशपातळीवर लढा देत आहेत. साऱ्यांना एकत्र करुन संघर्ष करत आहेत. केंद्राने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत त्यांना त्रास देत आहे. मात्र राहुल गांधी खचले नाहीत. काँग्रेसचा विचार हा साऱ्यांना बरोबर घेऊन वाटचाल करण्याचा आहे. भाजपवाले जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहेत. निवडणुकीच्या कालावधीत हजारो कोटीच्या विकासकामांच्या घोषणा होतील. मात्र प्रत्यक्षात काही असणार नाही. अशा सरकारच्या विरोधात ताकतीने लढू या. जनता माझ्यासोबत असल्याने कोणत्याही संघर्षाला मी तयार आहे. सामाजिक स्वास्थासाठी गांजा विरोधी मोहिम हाती घ्यावी लागेल. रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासाठी सज्ज व्हा’अशा शब्दांत पाटील यांनी आश्वस्त केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes