Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोण कुठेही जाऊ दे- कितीही उडया मारू दे ! कोल्हापुरात काँग्रेसला थांबविण्याची ताकत कोणात नाही !! निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गर्दीचा महापूरनगरविकासच्या सचिवांसाबत क्रिडाई पदाधिकाऱ्यांची २१ ऑगस्टनंतर मंत्रालयात बैठक-खासदार श्रीकांत शिंदेअमका आला, तमका गेल्याचे मला टेन्शन नाही, सतेज पाटील म्हणजे माणसं तयार करण्याची फॅक्टरी विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची घंटी वाजली ?नरके, क्षीरसागरांची सतेज पाटलांच्यावर टीकाजिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर - इचलकरंजीचा महापौर शिवसेनेचा करूया : कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनमहापालिकेतील लाचखोरी, ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या नावासहित टक्केवारीची रक्कम जाहीर  !!सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविलेसोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभहॉटेल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटील

जाहिरात

 

विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची घंटी वाजली ?नरके, क्षीरसागरांची सतेज पाटलांच्यावर टीका

schedule26 Jul 25 person by visibility 169 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा पराभव झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून आता कशी घंटी वाजवायला लावली असे फलक काहींनी उभे केले होते. असे फलक उभे करणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घंटी वाजवायला लावली. आता कोणाची घंटी वाजली ?   " अशी खरमरीत टीका शिवसेनेच्या आमदारांनी , काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता केली. आमदार राजेश क्षीरसागर व आमदार चंद्रदीप नरके यांनी  आमदार पाटील यांच्यावर निशाणा साधला.
 पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून कोल्हापुरातील नागाळा पार्क येथे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे संसदीय नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शनिवारी या कार्यालयाचे उद्घाटन झाले. माजी खासदार संजय मंडलिक, आमदार अशोक माने, माजी आमदार सुजित मिंणचेकर, जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा झाला‌. या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रदीप नरके यांनी मागील काही निवडणुकींचा संदर्भ घेत टीकास्त्र सोडले. जिल्ह्यातील काही मंडळींना मी म्हणेल ती पूर्व दिशा जिल्ह्यात आपण करेल ते राजकारण अशी धारणा बनली होती. त्यांच्या या प्रवृत्तीला विधानसभा निवडणुकीत चाप बसला. महावितेच्या उमेदवारांना भरघोस यश दिले. कोल्हापूरकरांना एखादी गोष्ट पटली की ते डोक्यावर घेतात आणि कोणी अतिरेक केला की संबंधितांना डोक्यावरून खाली उतरवतात. असा टोला नरके यांनी लगावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह जिल्हा बँक , दूध संघ या निवडणुका ताकतीने लढवायच्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून घंटी कशी वाजवली असे फलक काही नाही उभे केले . तथापि विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे दहा आमदार निवडून दिले. त्यावेळी कोणाची घंटी वाजली. फलक उभे करणाऱ्यांना घंटी वाजविण्यास लावली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes