घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नेपाळमध्ये कलाविष्कार
schedule16 Feb 24 person by visibility 1005 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी चितवन, नेपाळ येथे इंडो-नेपाळ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राममध्ये सहभागी सहभागी झाले होते. नेपाळमधील चितवन येथील प्रख्यात आंतरराष्ट्रीय शाळा अंकुराम अकादमीने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमामध्ये तीन शिक्षकांसह पंधरा विद्यार्थी सहभागी झाले.
पाच ते ११ फेब्रुवारी दरम्यान हा सांस्कृतिक देवाणघेवाण करणारा कार्यक्रम पार पडला. संजय घोडावत स्कूल मधील विद्यार्थ्यांनी गाणी आणि नृत्याद्वारे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे सादरीकरण केले. या कार्यक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थिनी ऋषिता शिंदे, अर्णव कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचा अनुभव आमच्यासाठी वेगळा होता असे सांगितले.
या कार्यक्रमात डॉ. नवीन एच एम, महादेव पिराजी आणि श्रीमती गुल ई राणा हे शिक्षक सहभागी झाले होते. अंकुराम अकादमी व्यवस्थापन, अध्यक्ष आनंदा बहादूर चंद, संचालक नईम चौधरी, कार्यकारी संचालक, सरला पौडेल, नवराज पौडेल, प्राचार्य . सुमन पौडेल यांनी घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांचा नेपाळमध्ये सहा दिवस उत्कृष्ठ पाहुणचार केला. संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी आंतरराष्ट्रीय शिक्षणात नवीन संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विश्वस्त विनायक भोसले, संचालिका श्रीमती सस्मिता मोहंती यांनी या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.