Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

नव साक्षरता कार्यक्रमात शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांचा सन्मान

schedule30 Sep 24 person by visibility 1000 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र  न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जन साक्षरता 'या संकल्पनेतून केंद्र सरकारने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता कार्यक्रमाची ठोस अमंलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केली. या उल्लास -नवभारत साक्षरता कार्यक्रम -राज्यस्तरीय उल्लास मेळाव्यात योजना  विभागाचे शिक्षणाधिकारी  डॉ.किरण लोहार यांच्या सेवेचा सन्मान शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते  झाला.
     वय वर्षे  पंधरा ते त्यापुढील वयोगटातील निरक्षर लोकांना(असाक्षर )पायाभूत साक्षरता, संख्यज्ञान , जीवन कौशल्य विकसित करण्या साठी स्वयंसेवक, शिक्षक , विद्यार्थी यांना उचित मार्गदर्शन करत स्वतः पुढाकार घेऊन काम केले. त्याच बरोबर पुणे येथील रत्नागिरी जिल्ह्याची स्टॉल मांडणी पाहून योजना विभागाचे संचालक  महेश पालकर, उपसंचालक राजेश क्षीरसागर  यांनी भेट देऊन तयारी पाहून समाधान व्यक्त केले.    
 रत्नागिरी जिल्ह्याने केलेल्या अतिउत्कृष्ट कामकाजा बद्दल रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यस्तर नवभारत साक्षरता मेळावा , एस सी आर टी पुणे येथे उत्साहात  झाला.शिक्षणाधिकारी (योजना )डॉ.किरण लोहार यांच्या या सेवेचा सन्मान शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी केंद्रीय सचिव अर्चना शर्मा , प्रधान सचिव आय ए कुंदन , शिक्षण आयुक्त सूरज मांढरे , राज्य प्रकल्प संचालक आर विमला , संचालक राहुल रेखा राव , शिक्षण संचालक शरद गोसावी , संचालक कृष्णकुमार पाटील , शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक संपत सुर्यवंशी , अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नंदकुमार बेडसे ,शिक्षण संचालनालय (योजना ) महाराष्ट्र राज्य डॉ. महेश पालकर या मान्यवरांची उपस्थिती होती.
रत्नागिरी जिल्ह्याने दिलेल्या उद्दिष्टच्या 200 टक्के हून अधिक केलेले काम, त्यातील सातत्य यामूळ 35 मंजूर स्टाफपैकी फक्त्त, तीनच जण कार्यरत असताना हे यश मिळवू शकलो यांचा खूप अभिमान वाटतो. असे लोहार यांनी सांगितले.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes