बँकॉक येथे डॉ. विद्युलता नाईक यांना पुरस्कार
schedule30 Jul 24 person by visibility 377 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बैंकॉक येथील इंटरनेशनल एज्यूकेशन बोर्ड ऑफ एस्थेटिक आणि कॉस्मेटोलॉजी यांच्यावतीने डॉ विद्युलता स्वप्निल नाईक यांना बेस्ट स्पिकर अवॉर्डने गौरवण्यात आले. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी इंटरनेशनल एज्यूकेशन बोर्ड ऑफ एस्थेटिक आणि कॉस्मेटोलॉजीचे प्रेसिडेंट अमित एस., डॉ.अली अहमद, डॉ. रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकॉक येथे झालेल्या परिषदेला डॉक्टर नाईक यांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉक्टर नाईक यांनी " आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी" या विषया वर व्याख्यान दिले. व्याख्यानामध्ये भारतीय आयुर्वेदातील औषधांची माहिती देताना कॉस्मेटोलॉजीमध्ये आयुर्वेदिक औषधांना जगभरातून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. परिषदेला जगभरातून १०० अधिक डॉक्टर्स आले होते.