Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटपशिवसेनेचा साठावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा

जाहिरात

 

रोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीस

schedule21 Jun 26 person by visibility 16 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे आणि सचिवपदी उद्योजक अविनाश चिकनीस यांनी पदभार स्वीकारला. ज्येष्ठ रोटेरियन सी.एम .बेंद्रे यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा झाला.

यावेळी बोलताना बेंद्रे यांनी रोटरीच्या  माध्यमातून माणुसकी जपत समाजातील विविध घटकांना मदत करण्याबरोबरच त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी  सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मावळते प्रेसिडेंट अभिजीत भोसले यांनी गेल्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. नूतन अध्यक्ष शेंडगे यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.  सचिव चिकनिस यांनी आभार मानले. रवी खोत, आर. वाय.पाटील यांचा उत्कृष्ट रोटेरियन म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर अभयसिंह बिचकर, संजय साळोखे, नीलेश पाटील उपस्थित होते. संदीप साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes