जिल्हास्तरीत बँडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, दिवसभरात ९० सामने
schedule28 Jun 24 person by visibility 621 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा बँडमिन्टन असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय बँडमिन्टन स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली. खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाने पहिल्याच दिवशी स्पर्धेत रंगत आली. दिवसभरात ९० सामने झाले. अंबाई डिफेन्स येथे या स्पर्धा होत आहेत. कँस्प्रो ग्रुपचे महेंद्र राठोड व मिराशा ग्रूपचे आदित्य शहा, श्रीमती सिमा शहा यान्च्या हस्ते सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले. ही स्पर्धा शिरगावकर ग्रूपने पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेतून १७ व १९ वयोगटासाठी जिल्हा संघाची निवड होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बँडमिटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे, सचिव वर्षादेवी नाडगौडे, सहसचिव विनोद भोसले, खजिनदार चंद्रशेखर सोहोनी, आशिष आमण्णा, दुर्गादास बसरुस, सुमित चौगुले, साईदास, निशांत पाटील आदी उपस्थित होते.