Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रक

जाहिरात

 

गोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीम

schedule25 Jul 26 person by visibility 25 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकरी व भाविकांना मोफत सुगंधी दूध आणि सार्थ हरीपाठ पुस्तिकांचे वाटप पुईखडी येथील रिंगण सोहळा परिसरात करण्यात आले. वारकऱ्यांची सेवा करण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश देण्याचाही उपक्रम यावेळी राबविण्यात आला.

          यावेळी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य सागर बलकवडे तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते वारकऱ्यांना सुगंधी दूध, हरीपाठ पुस्तिकांचे वाटप करण्यात आले." आपली दिंडी  स्वच्छ दिंडी", "एक पाऊल भक्तीकडे... एक पाऊल स्वच्छतेकडे", "दूध पिऊया... पिशवी कचरापेटीत टाकूया", "माऊलींची वारी, स्वच्छतेची जबाबदारी" असे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक गोकुळतर्फे रिंगण सोहळा परिसरात लावण्यात आले होते.

          विशेष म्हणजे, दिंडी पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गोकुळच्या १५ स्वयंसेवकांनी यांनी दूध वाटप करण्यात आलेल्या परिसरातील रिकाम्या दुधाच्या पिशव्या व इतर कचरा गोळा करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. स्वच्छतेचा संदेश केवळ फलकांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीतूनही गोकुळने सामाजिक बांधिलकी जपली. संघाचे डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, प्रविण देसाई, संतोष पाटील, प्रमोद घोडके, उल्हास पाटील, वसंत माळवी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes