Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

डीवाय पाटील पॉलिटेक्निकची बॅडमिंटनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक

schedule27 Feb 26 person by visibility 183 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील डॉ डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकच्या मुलांच्या संघाने पदविका विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. सावंतवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यातील अकरा संघ  सहभागी झाले होते.
या विजयी संघात अथर्व शिंदे, हेत छाभैय्या ,तनिष्क यादव ,मितेश पटेल ,मेहुल पटेल यांचा समावेश आहे.डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. .के.गुप्ता, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, उपप्राचार्य नितीन माळी , रजिस्ट्रार महेश रेणके जिमखाना विभागप्रमुख अक्षय करपेप्रा. सुरज जाधव यांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

इंटर इंजिनीरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा झाल्या. डॉ डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक संघाने शरद पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक रत्नागिरी आणि अंतिम सामन्यात  संजय घोडावत पॉलीटेक्निक या संघावर विजय मिळवले. विजेता डी. वाय.पाटील संघ संजीवनी केबीपी पॉलीटेक्निक कोपरगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes