Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णय

जाहिरात

 

डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार

schedule01 Sep 26 person by visibility 8 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याचा संदेश देत डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या व्यवस्थापन विभागातील फिटनेस क्लबतर्फे कुशिरे येथे निसर्ग ट्रेक आणि बीजगोळे निर्मिती उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ५०० हून अधिक बीजगोळे तयार करून परिसरात त्याची पेरणी केली. 

बीजगोळे तयार करण्यासाठी करंज, शेवगा, जांभूळ, सीताफळ, रामफळ, हिरडा आणि बेहडा यांसारख्या स्थानिक व देशी वृक्षप्रजातींच्या बियांचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः बीजगोळे तयार करून त्यांचे कुशिरे व परिसरातील निवडक योग्य ठिकाणी प्रसारण केले. या उपक्रमातून स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सहायक प्राध्यापक अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना बीजगोळे तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून समजावून सांगितली. बीजगोळ्यांचे पर्यावरणीय महत्त्व, देशी वृक्षप्रजातींचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण तसेच पर्यावरण संवर्धनातील विद्यार्थ्यांची भूमिका याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. रोहित लांडगे, डॉ.  पुरुषोत्तम पेटारे, डॉ.  मुग्धा देशपांडे, डॉ.  रेणुका तुरंबेकर, प्रा.  सागर जानराव, प्रा.  व्यंकटेश बडवे, प्रा.  अनिकेत परदेशी यांच्यासहित श्री. दीपक बंडागळे उपस्थित होते. या उपक्रमास डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. अजित पाटील, डी. वाय. पाटील स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अँड बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे संचालक डॉ. ए. एम. गुरव यांचे मार्गदर्शन  लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes