Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकजा मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटीलभटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकर

जाहिरात

 

दूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

schedule31 Aug 26 person by visibility 10 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट (परीक्षेची प्रभावी तयारी करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्यावतीने  १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर २०२६ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी सहा या वेळेत  सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.प्रतिभा पाटणकर यांनी दिली. 
 या कार्यशाळेचे उदघाटन प्र - कुलगुरू प्रा.डॉ.ज्योती जाधव करणार असून प्रमुख उपस्थितीत कुलसचिव डॉ. विलास शिंदे असणार आहेत.    या कार्यशाळेत सेट  परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, प्रश्न सोडविण्याच्या पद्धती, वेळेचे नियोजन, संदर्भ साहित्याची निवड तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पेपर-१ मधील अध्यापन व संशोधन अभिवृत्ती, तर्कशक्ती, संवाद कौशल्य, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान यांसह विविध घटकांवर डॉ.कृष्णा पाटील,डॉ.शशिकांत अन्नदाते.डॉ.मारुती लोंढे व डॉ.शशिकांत शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन मिळणार आहे.
        त्याचबरोबर दुसऱ्या पेपरसाठी विषयनिहाय प्रा.डॉ.भारती पाटील व डॉ.सुचिता सुरगीहळी (राज्यशास्त्र), डॉ.दिग्विजय पाटील व डॉ.मोहन सोरटे (अर्थशास्त्र),प्रा.डॉ.संजय कोळेकर व डॉ.प्रल्हाद माने (समाजशास्त्र), प्रा.डॉ.सुरेश शिखरे व डॉ.हृषिकेश दळवी (इतिहास), डॉ.सुधीर लेंडवे व दीपक भादले  (इंग्रजी), प्रा.डॉ.अनिल गवळी व डॉ.गजानन अपिने (मराठी), प्रा.डॉ.संदीप कदम व प्रा.डॉ.नरसिंह कदम (हिंदी),डॉ.कुलवीर कांबळे व डॉ.प्रवीण जाधव (एम.बी.ए,) डॉ.सागर वाळवेकर व डॉ.रोहित बसनाईक (वाणिज्य)  बालाजी मोहिते व सौरभ स्वामी (गणित) आदी तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. सेट  परीक्षेत यश मिळविण्यासाठी नियोजनबद्ध अभ्यास, योग्य संदर्भ साहित्य आणि प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव महत्त्वाचा असतो. या उद्देशाने विद्यार्थ्यांना परीक्षेची शास्त्रीय तयारी करण्यासाठी कार्यशाळेचा निश्चितच लाभ होणार आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या तसेच सेट/नेट  परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://meet.google.com/hso-hmkt-oii  या गुगल मीट लिंकला जावून सहभागी होवून  या मार्गदर्शन कार्यशाळेचा लाभ घ्यावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes