Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटेशिक्षक आमदार - जयंत आसगावकरांच्यासमोर आव्हान, महायुतीत रस्सीखेच! माजी आमदारही शर्यतीत !पोलिस प्रमुखांचे गणेश मंडळांना आवाहन ! उत्सवात लेझरचा वापर नको - आवाजाची मर्यादा पाळा!!७८९ दूध संस्था अपात्र, कागल – करवीर -राधानगरीतील संस्थांचा समावेश! दूध संस्था प्रतिनिधीची अधिकाऱ्यांना उद्देशून एकेरी भाषा !!कोल्हापूर शहर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर, शहर अध्यक्षपदी प्रा. अमरसिंह शेळकेदूरशिक्षण -ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्फे सेट परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळाकुपोषित बालकांना जिल्हा परिषद दत्तक घेणार, महिला व बालकल्याण समितीत निर्णयडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकन

जाहिरात

 

कार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!

schedule01 Sep 26 person by visibility 117 categoryमहानगरपालिका

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : ‘बहुजन हितायबहुजन सुखाय ’हे महापालिकेचे ब्रीद वाक्य. लोकांचे सेवक म्हणून नगरसेवक निवडून दिलेले. विश्वस्त म्हणून त्यांनी काम केली पाहिजेत ही शहरवासियांची माफक अपेक्षा. मात्र काही नगरसेवकांची बातच न्यारी. सभागृह असो की स्थायी समितीची बैठक, वा अधिकाऱ्यांचे ऑफिस. प्रत्येक ठिकाणी या नगरसेवकांचा ‘आम्ही म्हणेल तीच पूर्वदिशा, आमच्याशिवाय बाकीच्यांनी कोणी बोलायचे नाही.’असा पवित्रा. मंगळवारी (एक सप्टेंबर २०२६) रोजी सत्ताधारी घटकातील महायुतीच्या दोन गटनेत्यांनी सारी हद्द ओलांडत आयुक्त, पदाधिकाऱ्यांच्या समोरच एकमेकांविरोधात शडडू ठोकले. एकमेकांना उद्देशून एकेरी उल्लेख करत ‘चौकात चल, बघून घेतो’अशी दादागिरीची भाषा केली. कार्यालयात नगरसेवकांची भांडणे आणि त्यानंतर काही मिनिटातच चौकात दोन्ही नगरसेवकांचे जमलेले कार्यकर्ते, यामुळे महापालिकेचा आपण आखाडा बनवतोय याचेही भान संबंधितांना राहिले नाही. इतके होऊनही महापालिकेचे पदाधिकारी, ‘हा कौटुंबिक वाद हा आहे.’असे स्पष्टीकरण देत प्रकरणावर पडदा टाकतातयासारखे दुर्दैव नाही.

मंगळवारी महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आयोजित केली होती. आयुक्त कार्यालय लगतच्या सभागृहात दुपारी दोन वाजता बैठकीला सुरुवात झाली. आयुक्त राजेंद्र भारुड, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, सभागृह नेते मुरलीधर जाधव, शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आदिल फरास, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, प्राधिकरण समिती सदस्य रवींद्र साळोखे, अमोल बुढढे आदींची उपस्थिती होती. प्रभागनिहाय वृक्ष फांद्या तोडीच्या विषयाची चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेतून  शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास यांच्यात वादाची फैरी झडली.उपलबध् माहितीनुसार टिंबर मार्केट परिसरातील विषय उपस्थितत झाला. त्यावेळी नगरसेवक फरास यांनी अधिकाऱ्यांना उलटसुलट प्रश्ने विचारली. त्यानंतर हनुमाननगर परिसरातील विषय उपस्थित झाला. त्यावेळी नगरसेवक देशमुख यांनी काही प्रश्ने उपस्थित केली. त्यावर आमच्या पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रभागातील विषयावर प्रश्न कशाला उपस्थित करता असा सवाल फरास यांनी केला. त्यावर देशमुख यांनी अधिकाऱ्यांना प्रश्ने विचारली आहेत. पक्षीय संबंध नाही असे ठणकावले. यावरुन दोघांत वाद सुरू झाला.

शाब्दिक वाद वाढत जाऊन हमरीतुमरीपर्यंत प्रकरण पोहोचले. दोन वाजून वीस मिनिटे ते दोन वाजून तीस मिनिटे अशी जवळपास दहा मिनिटे हमरीतुमरी सुरू होती. मोठयाने ओरडणे, अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटीचा आवाज कार्यालयाच्या भिंती पार करुन चौकात पोहोचला. एव्हाना आयुक्त भारुड हे बैठकीतून बाहेर पडले होते. अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. पण ते दोघे नगरसेवक मोठयाने ओरडत, एकमेकांना बघून घेण्याची भाषा करत होते. त्यांच्यातील वादामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला. अन्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व चौकात कामानिमित्त आलेले नागरिक आयुक्त् कार्यालयानजीकच्या सभागृहाकडे धावले. दरम्यानच्या कालावधीत या दोन्ही नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी चौकात गर्दी केली.एका बाजूला देशमुखांचे तर एका बाजूला फरासांचे कार्यकर्ते. तणावात आणखी भर पडली. प्रशासनाने पोलिसांना कळवून बंदोबस्ताची मागणी केली. तर कार्यालयात भांडणाऱ्या दोन्ही नगरसेवकांना वेगवेगळया ठिकाणी इतरांनी नेले. फरास यांना आयुक्त कार्यालयात तर देशमुख यांना त्यांच्या कार्यालयात. मात्र चौकातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. अधिकारी आणि कर्मचारी भेदरलेल्या स्थितीत. पोलिसंनी वेळीच हस्तक्षेप करत चौकातील कार्यकर्त्यांना पांगविले. महापालिका चौकात व महापालिका बाहेर पोलिस बंदोबस्त वाढविला. दुपारी अडीच ते दुपारी साडे चार वाजेपर्यंत महापालिका परिसराने तणाव अनुभवला. सर्वच कार्यालयातील कामकाज ठप्प असल्यासारखी स्थिती. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांतही नगरसेवकांच्या भांडणाची चर्चा. कामानिमित्त महापालिकेत पोहोचलेले नागरिकही अस्वस्थ. महापालिकेतील सत्ताबदल, केंद्रात, राज्यात व महापालिकेत महायुतीच सत्ता म्हणून उंचावलेल्या भल्या मोठया अपेक्षा, मात्र वास्तविक स्थिती मात्र वेगळीच. ‘बहुजन हितायबहुजन सुखाय’पेक्षा सगळं काही स्वकेंद्रित कारभारासाठी भांडणारे, सर्वसाधारण सभेत व अधिकाऱ्यांच्या बैठकीत अर्वाच्च भाषा वापरणारे नगरसेवक पाहून नागरिक मात्र कपाळावर हात मारुन घेत होते. एरव्ही आंदोलने, मोर्चासाठी महापालिका चौकाने पोलिस बंदोबस्त अनुभवला होता. मंगळवारी, नगरसेवकांतील भांडणे, त्यानंतर चौकात जमलेले कार्यकर्ते व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून मागविलेली पोलिसांची कुमक हा सारा प्रकार शरमेने खाली मान घालायला लावणारा, नगरसेवकपदाची अब्रू धुळीला मिळवणारा होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes