Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशनगुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल भक्तीगीत कार्यक्रमन्यू इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये स्क्रूटिनी सेंटर मंजूर – डॉ. संजय दाभोळेपरख –राष्ट्रीय सर्व्हेक्षणमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमशक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांनाशक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार आंदोलन, तीन तास राष्ट्रीय महामार्ग ठप्पस्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबा

जाहिरात

 

नगरसेवक शारंगधर देशमुखांना पितृशोक

schedule11 Sep 24 person by visibility 792 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे कार्याध्यक्ष व टिंबर व्यावसायिक वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे बुधवारी (११ सप्टेंबर २०२४) निधन झाले. मृत्यूसमयी ते ७६ वर्षाचे होते. गुरुवारी (१२ सप्टेंबर) रोजी सकाळी दहा वाजता अंत्ययात्रा आहे. ते दादा या नावांनी परिचित होते. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांचे ते वडील होतं.
वसंतराव देशमुख हे विविध संस्थेशी निगडीत होतते मूळचे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुजगावचे. त्यांचा जन्म दोन जून १९४९ रोजी झाला होता. जुनी मॅट्रिकपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांचा जन्म सांगली जिल्ह्यात तर कर्मभूमी कोल्हापूर ठरली. प्रारंभी त्यांनी मामांच्याकडे लाकूड वखारीत काम केले. दहा वर्षे काम केल्यानंतर १९७६ मध्ये त्यांनी, ‘श्रीराम टिंबर सॉ मिल’ या नावांनी व्यवसाय सुरू केला. श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
 त्यांनी १९९० मध्ये स्थापन केलेली वसंतराव देशमुख हायस्कूल आज कोल्हापुरातील नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर जिल्हा टिंबर व्यापारी व लघु औद्योगिक व्यापारी संघाचे ते अध्यक्ष होते. तसेच त्यांनी साईकृपा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आहे. २००० मध्ये देशमुख सांस्कृतिक भवनची स्थापना केली. विविध संस्थेत सक्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातंवडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes