Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण विभागातील अकरा अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोल्हापूर - सांगलीतील अधिकाऱ्यांचा समावेश श्रीपूजक मंडळ - समिधा प्रतिष्ठानतर्फे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपबांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला ३८ हजाराच्या लाचप्रकरणी अटकभागीरथी महिला संस्थेतर्फे कोल्हापुरातील बालाजी पार्कमध्ये वैद्यकीय तपासणीगोकुळसाठी ५४३९ ठराव दाखल ! करवीर,  राधानगरी -राधानगरी- कागल-भुदरगडमधून जास्त ठराव ! !जिल्हा परिषदेत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी बांधकाम व्यावसायिकाला एक कोटीच्या खंडणीसाठी धमकावले, साईटवरील बांधकाम बंद पाडले !  पाच खंडणीखोराविरोधात गुन्हा !!शिवसेना ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुखपदी विराज पाटीलमुख्याध्यापक पदोन्नतीसाठी पाच तास विलंब, ऐनवेळी नावे घुसडण्याचा प्रकारशिरोळ तालुक्यातील २५ संस्थांचा भाजपला पाठिंबा, भाापकडील ठरावांची संख्या १४५५

जाहिरात

 

मंडल अधिकाऱ्याला २७ हजाराची लाच घेताना अटक

schedule23 Dec 25 person by visibility 685 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे यांना २७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जनवाडे हे कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड, अरुण सरनाईकनगर, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर येथील आहेत. सात-बारा पत्रकी नाव लावण्यासाठी जनवाडे यांनी तक्रारदारांकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने १९ डिसेंबर रोजी यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी, १९ व २० डिसेंबरला पडताळणी केली. पोलिसांनी तक्रारीनुसार सापळा लावला.२३ डिसेंबर रोजी मंडल अधिकारी जनवाडे हे तक्रारदारांकडून दहा हजारपैकी सात हजार रुपये व अन्य चार प्रकरणासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. तसेच जनवाडे यांचा मोबाइलही जप्त केला आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानाची झडती घेतली जात आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, विकास माने, सचिन पाटील, उदय पाटील यांनी  सहभाग घेतला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes