जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील
schedule08 Jul 26 person by visibility 29 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंध श्रीमती डॉ.डी.यु.पाटील होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या संचालकांची बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी पाटील यांना संचालक संजय शिंदे हे सूचक व संचालक जयकुमार रेळेकर यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदी निवड झाल्यानंतर बोलताना पाटील म्हणाले, ' जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या उल्लेखनीय कारभाराबाबत नावलौकीक प्राप्त केले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाची मातृसंस्था असलेल्या या संस्थेने जिल्हा परिषदेतील अनेक विभागातील कर्मचारी यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि कौटुंबिक उत्कर्ष करण्यामध्ये या संस्थेने नेहमीच मोलाचा हातभार लावलेला आहे. अशा या संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक झेप घेतली असून संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करणेस आम्ही सर्व संचालक व सुकाणू समिती कटिबध्द आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकीकात भरीव वाढ करण्यासाठी नियोजनबद्द काम करणेची ग्वाही दिली. यापुढेही संस्थेचा कारभार सुकाणू समितीच्या मार्गदर्शनानुसार व सर्व संचालकांच्या सहकार्याने सभासदांच्या हिताचा व पारदर्शकपने, काटकसरीने करणेच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.'
निवडीवेळी व्हाईस चेअरमन जयकुमार रेळेकर, संचालक नंदिप मोरे, श्रीकांत चव्हाण, रविंद्र जरळी, सुनिल पाटील, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, सचिन गुरव, उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहूलराज शेळके, सुरेश सुतार, अजय शिंदे, संजय शिंदे, सरदार दिंडे, सरोजनी कोरी, सोनाली गुरव उपस्थित होते. तज्ञ संचालक- प्रविणकुमार पाटील, काकासाहेब पाटील आहेत. संस्थेचे मार्गदर्शक- एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकूरे, एम.एम. पाटील, के.आर. किरूळकर, राजाराम वरूटे, राजीव परीट, रविकुमार पाटील, मनोहर भाट, साताप्पा मोहिते, अजित मगदुम, शांताराम माने, विजय टिपुगडे, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट, कपिल पाटील यांनीही नूतन चेअरमन यांचे अभिनंदन केले.