Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बिनविरोधच्या चर्चेत तथ्य नाही, गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार-  आमदार सतेज पाटीलउद्योग क्षेत्रातील नवीन संधीविषयी कोल्हापुरात दोन दिवसीय विशेष कार्यक्रमकिकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे ईडीमार्फत  चौकशी करा - राजवर्धन नाईक निंबाळकरसंच मान्यता  त्रुटी  दुरुस्तीसाठी शिक्षण उपंचालकांसोबत चर्चा कोल्हापूर फर्स्टतर्फे जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार ! कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्र विकास परिषद भरविणार !!डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सतंत्रज्ञान युगात जीआयएसचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक : कुलगुरू  डी. टी. शिर्केमार्केट सेस चालूच राहणार, कोल्हापूर बाजार समितीचे राष्ट्रीय बाजार समितीत वर्गीकरण नाही - मंत्री जयकुमार रावळ सार्वजनिक कार्यक्रमात अश्लिल - आक्षेपार्ह नृत्य सादरीकरणास प्रतिबंध करा - कलापथक निर्माता असोसिएशनराज्यस्तरीय तेली समाजाच्या व्यासपीठावर मंत्री बावनकुळे - विजय वडेट्टीवारांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी ! पक्ष प्रवेशाची ऑफर, एक नंबर मंत्रीपदासाठी शुभेच्छा!!

जाहिरात

 

श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मोफत सुविधा केंद्र

schedule08 Jul 26 person by visibility 136 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन : युवा ग्रामीण विकास संस्थेच्या श्री आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पाल (गारगोटी) येथे पदवी इंजिनिअरिंग (बी. टेक.) प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनमान्य 'स्कुटीनी केंद्र' (सुविधा केंद्र) कार्यान्वित करण्यात आले आहे. इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संस्थेने विशेष नियोजन केले आहे.

या केंद्रात ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांचे स्कॅनिंग, पडताळणी, अपलोड करणे आणि अर्ज निश्चिती या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच, तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत कॅप राऊंडची माहिती आणि इंजिनिअरिंगनंतरच्या करिअर व नोकरीच्या संधींविषयी मार्गदर्शन केले जात आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि शासकीय योजनांची सविस्तर माहितीही येथे मिळणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा वेग लक्षात घेता सुट्टीच्या दिवसांतही म्हणजेच रविवारसह सर्व दिवस हे केंद्र सुरू राहणार आहे. राज्य सीईटी सेलद्वारे आयोजित प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज निश्चितीची मुदत १२ जुलै 2026 पर्यंत आहे.संस्थेचे अध्यक्ष प्रा.अर्जुन आबिटकर, प्राचार्य डॉ.उमेश पाटील यांनी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांना या मोफत सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes