Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा अकरा जुलैला बंद, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चापोलिस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना पोलिस अधिकाऱ्याला पकडलेशेतकऱ्यांच्यासोबत पिठलं भाकरी, चिखलगुठ्ठा करुन भात रोपांची लागण ! एक दिवस बळीराजासोबत !!कोल्हापुरात दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा-मंत्री हसन मुश्रीफगोकुळमध्ये सहकार दिनानिमित्त विविध उपक्रम, बचत गटाच्या स्टॉलवर हजारोंची उलाढालशरद पवार पक्षाच्या मेळाव्याला हाऊसफुल्ल गर्दी !आगामी निवडणूक कार्यकर्त्यांची, आघाडीचे सर्वाधिकार जिल्हा पातळीवर हवेत !!सहकारातूनच मानवी जीवनाचा खऱ्या अर्थाने विकास : प्राचार्या वर्षा मैंदर्गीनूतन मराठी विद्यालय हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी हेरिटेजचे बळराज्यातील एमफिल प्राध्यापकांना न्याय, पंचवीस वर्षाचा प्रश्न निकालीमार्केट यार्डातील व्यापार-व्यावसायिकांची सामाजिक बांधिलकी, स्वखर्चातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

जाहिरात

 

प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न, कोर्टाच्या इमारतीतच घडला प्रकार

schedule28 Mar 25 person by visibility 573 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज,  छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकरला शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागले.शुक्रवारी (28 मार्च) दुपारी सुनावणी संपल्यानंतर कोर्टातून बाहेर नेत असताना एका वकीलानेच कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी या वकिलाला ताब्यात घेतले. पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त  असतानाही कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. दरम्यान कोर्टाने कोरटकरला, 30 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडी दिली
छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कोरटकरला अटक झाली आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनाही त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तब्बल महिनाभर पसार असलेल्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणा येथे अटक केली होती. त्यानंतर कोर्टापुढे हजर केले असता कोरटकरला तीन दिवसाची कोठडी दिली. तीन दिवसाच्या कोठडीची मुदत 28 मार्च रोजी संपत असल्यामुळे पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा एकदा कोरटकरला कोर्टापुढे हजर केले. कोल्हापुरातील जिल्हा व सत्र न्यायालय येथे सुनावणी सुरू आहे.  शिवप्रेमींचा रोष पाहून पोलिसांनी सकाळी आठ वाजताच  कोरटकरला पोलीस  स्टेशनमधून बाहेर काढून कोर्टाकडे नेले.दुपारी बारा वाजता सुनावणीला सुरुवात झाली. सुनावणी संपल्यानंतर कोर्ट इमारतीमधील कॅन्टीनसमोरील मार्गाने कोरटकरला बाहेर नेत असताना रुकडी येथील वकील अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींचा अपमान करतोस का असा जाब विचारत वकील भोसले यांनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी तत्काळ वकिलाला ताब्यात घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes