Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! ! शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता -आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज :  शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंतड्रायव्हर सीटवर खासदार, बसमध्ये नगरसेवक ! पीएमईच्या नव्या वाहनातून फेरफटका !!ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे चार ऑगस्टपासून संतांचे संगती निरुपण सोहळा राज्यव्यापी व्यापारी परिषदेला राज्यातून प्रतिनिधी उपस्थित राहणारमहाराष्ट्रातील सामाजिक चळवळीला अण्‍णा भाऊ साठे यांच्‍या साहित्‍याने लेखनबळ - संजय कृष्णाजी पाटील केआयटीत जागतिक दर्जाचे डिझाइन सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांसाठी उपलब्धकरुन दाखविलं…केएमटीला मिळतोय नवा चेहरा, सेवेचा परिघ विस्तारणार! रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही कायमची शाश्वती !! २७ कोटीचा घरफाळा थकीत, महापालिकेकडून स्टार बझारची इमारत सील ! सर्कीट बेंचकडून कारवाईला स्थगिती ! !महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ, लक्ष्मीपुरीत साकारले कलापुरीचे कलादालन

जाहिरात

 

जिल्ह्यातील सगळे दिग्ग्ज सत्तेत…राजकारणात माझ्यासारखा विरोधक एखादाच… मलाही सांभाळून घ्या ! सतेज पाटलांना मुश्रीफांच्या शुभेच्छा…प्रकाशअण्णा राजकारणात धुरंधर ! !

schedule02 Aug 26 person by visibility 268 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : राष्ट्रवादीचे नेते आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना दिलेल्या शुभेच्छाआमदार सतेज पाटील यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा राजकारणातील धुरंधर म्हणून केलेला उल्लेखप्रकाशअण्णांनी हात जोडून त्याला दिलेली दाद दोघांतील या संवादाने कार्यक्रमस्थळी निर्माण झालेला हास्यकल्लोळत्याच वातावरणात सतेज पाटील यांनी व्यासपीठाकडे पाहत, ‘जिल्ह्यातील सगळे दिग्गज सत्तेत, विरोधात मी एकटाच. सत्तेत विरोधक असणेही फायद्याचं असतंतेव्हा मलाही सांभाळून घ्या’अशी केलेली टोलेबाजीयामुळे दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन चांगलेच रंगले.  राजकीय नेतेमंडळीच्या या शाब्दिक कोटीबाजीचे उपस्थित प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने राजकीय तर्कवितर्कही लढवू लागले.

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन रविवारी २ ऑगस्ट २०२६ कोल्हापुरात झाले. सभेसाठी दक्षिण भारत जैन सभेचे हजारो प्रतिनिधी कोल्हापुरात एकवटले. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी अधिवेशनला प्रारंभ झाला. सुरुवातीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. अकरा वाजण्याच्या सुमारास अधिवेशनाचे उद्घाटन झाले.स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी होते. मंत्री मुश्रीफ, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार संजय पाटील, वीरकुमार पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे आदींच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचे उद्घाटन झाले. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते स्मरणिका प्रकाशन झाले. याप्रसंगी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना उद्देशून ‘तुम्हाला राजकीय शुभेच्छा, विरोधी पक्षनेतेपद तुम्हाला मिळो.’अशी कोटी केली. भाषण करुन मंत्री मुश्रीफ हे अन्य कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यानंतर काही वेळात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले.

आमदार सतेज पाटील यांनी भाषणाच्या प्रारंभी दक्षिण भारत जैन सभेला डॉ. डी. वाय. पाटील यांच्याकडून दहा लाख रुपयांचा निधी देत असल्याचे घोषित केले. त्या रकमेच्या व्याजातून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी अशी सूचनाही त्यांनी केली. व्यासपीठावर नजर टाकत त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व ज्यांच्या हाती राज्याचे आरोग्य आहे ते प्रकाश आबिटकर असा उल्लेख केला. सतेज पाटील यांनी, ‘मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषण करताना मला शुभेच्छा दिल्या. मला वाटलं ते गोकुळसाठी शुभेच्छा देतील, पण त्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी शुभेच्छा दिल्या.’असे म्हणताच कार्यक्रमस्थळी पुन्हा हास्य पिकले. त्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्याकडे पाहत, ‘राजकारणातील धुरंधर अण्णा’असा उल्लेख केला. त्यावर माजी मंत्री आवाडे यांनी सतेज पाटील यांच्याकडे पाहत हात जोडले. त्याक्षणी कार्यक्रमस्थळी एकच हंशा पिकला. व्यासपीठावर नजर टाकत आमदार पाटील यांनी, ‘जिल्ह्यातील सगळे दिग्गज सत्तेत आहेत आणि आता व्यासपीठावर आहेत. काँग्रेसचा मी एकटाच आह. बघा, मला किती काळजी घ्यावी लागते.’ अशी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या विधानावर व्यासपीठावरील नेतेमंडळींनाही हसू आवरले नाही. पुढे सतेज पाटील म्हणाले, ‘राजकारणात विरोधक असायला हवा. आणि माझ्यासारखा विरोधक असणं हे फायद्याचं असतं, अण्णा. तेव्हा मलाही सांभाळून घ्या.’असे उद्गार काढताच साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

 

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes