Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्यागोकुळमार्फत सेवाभावी उपक्रमांनी मंत्री मुश्रीफांचा वाढदिवस साजरा 

जाहिरात

 

लोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्र

schedule27 Mar 26 person by visibility 93 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खासदार, आमदार, जिल्हा परिषद पदाधिकारी - सदस्य व पंचायत समिती सभापती  हे लोकप्रतिनिधी त्यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात दिलेल्या पत्रावर योग्य तो कार्यवाही करुन संबंधित लोकप्रतिनिधी यांना किमान दहा दिवसाच्या लेखी स्वरुपात कळवावे. तसेच जिल्ह्यात गाव तिथं स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी कार्यवाही करावी अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना दिले.

जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती या अत्यंत दुर्गम, डोंगराळ व वाड्या-वस्त्या मध्ये विखुरलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर विविध बाजार, सामाजिक, धार्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. अशा वेळी नागरीकांना विशेष करुन महिलांना स्वच्छता गृहाची उपलब्धता नसल्यामुळे मोठी गैरसोइंस सामोरे जावे लागते. त्यामुळे 15 वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीमधुन मोठ्या गावामध्ये स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणेत यावी.

सद्यस्थितीत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना केंद्रीय वित्त आयोग व शासनाकडुन मोठ्या प्रमाणावर विकास कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. यामधून रस्ते, गटर्स, पाणी व स्वच्छता, हागणदारी मुक्त गांव, समृद्ध ग्रम पंचायत अभियान, नळ पाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाड्या सक्षम केल्या आहेत.परंतु सद्यस्थितीमध्ये ग्रामपंचायतींना विज बील भरणेसाठी निधी उपलब्ध नसलेने ग्रामपंचायत पाणी पुरवठा, ग्रामपंचात इमारत, समाज मंदिर, तालीम संस्था या ठिकाणी असणारी विज कनेक्शन विद्यत वितरण कंपनी कडुन कनेक्शन तोडण्याचे प्रकार मोठया प्रमाणावर होत आहेत.त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीन पंधरावा वित्त आयोग बंधित निधीतून सौर प्रणाली व गावांतर्गत सौर पथदिवे आस्थापित करणेत याव्यात. अशा अपारंपारिक स्त्रोतांचा मोठया प्रमाणावर वापर केल्यास ग्रामपंचायतींना विज देयकावरीलही खर्च कमी होण्यास मदत होईल.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes