Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिककोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे पुरस्कार जाहीर, रविवारी वितरण समारंभअभ्यासाचा भोंगा…!सतेज पाटलांनी गाजविली विधान परिषद, गृहखात्यासह सरकारच्या कामकाजाचे काढले वाभाडेदर्पण फाउंडेशन-रोटरी क्लबतर्फे विद्यार्थ्यांसाठी उमंग २०२६ समूहनृत्य स्पर्धा

जाहिरात

 

केआयटीत रंगला तरुण उद्योजकाचा विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद

schedule26 Sep 24 person by visibility 692 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ध्येय वेडे व्हा.कोणतेही काम १०० टक्के आत्मीयतेने केले पाहिजे त्याचबरोबर जी परिस्थिती समोर येईल त्याला सामोरे जा आणि त्याला तोंड द्या’ असा  सल्ला सल्ला कोल्हापुरातील तरुण उद्योजक ध्रुव मोहिते यांनी मित्रत्वाच्या नात्याने विद्यार्थ्यांना दिला. 
निमित्त होतं, येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या वॉक विथ वर्ल्ड या विद्यार्थी व्यासपीठाच्या वतीने ‘स्प्रिंटर्स २०२४’ या कार्यक्रमाचे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवासामध्ये स्वतःचा कशाप्रकारे विकास केला पाहिजे हा हेतू या २ दिवसीय कार्यक्रमाचा होता. कार्यक्रमाच्या समारोपासाठी उद्योजक मोहिते उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांनी  मनमोकळेपणाने संवाद साधला. आपली महाविद्यालयीन वाटचाल, त्यांच्या वेळच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतील असलेला बदल आणि सुसंवाद कसा साधला पाहिजे याविषयी चर्चा केली. 
 केआयटीचे रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.  कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रांमध्ये आदित्य साळुंखे, जान्हवी भोसले आणि अवनी शिंदे यांनी ‘सुसंवाद (कम्युनिकेशन)’ या विषयावर मार्गदर्शन केले. दुसरे सत्र ‘नेटवर्किंग आणि सोशालायझिंग’ या विषयावर होते. ज्यामध्ये आदिप देसाई आणि शिवांजली पाटील यांनी ‘लिंक्ड-इन’ या माध्यमावर मार्गदर्शन केले. टेक्निकल सत्रामध्ये राजवर्धन नलवडे, समीक्षा बुधले आणि अथर्व तेलंग यांनी मुलांना विविध कोडींग प्लॅटफॉर्मचा आणि युट्युब माध्यमांचा कुशल वापर या बाबत तपशीलवार मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी इंजिनिअरिंगची चार वर्षे या विषयावरती यश पोवार आणि जान्हवी वणकुद्रे यांनी मार्गदर्शन केले. 
केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी महाविद्यालयातील  विविध उपक्रमांची माहिती दिली. दोन दिवसीय या कार्यक्रमांमध्ये २७० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ. जितेंद्र भाट, वॉक विथ वर्ल्ड चे समन्वयक प्रा.अमर टिकोळे, सह-समन्वयक प्रा.प्रसाद जाधव आणि विद्यार्थी प्रतिनिधी रिया पवार, सिद्धी यादव, उपस्थित होते.  सुजल माळी यांनी आभार मानले.


जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes