सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने प्रतिकात्मक दहीहंडी
schedule05 Sep 26 person by visibility 3 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक येथे मराठा आरक्षण कोंडी फुटण्यासाठी प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत दहीहंडीचं पूजन झाले. शौर्यपीठाचे प्रसाद जाधव यांनी मनोज जरांगे आणि सरकारमधील चर्चा व मराठा समाजाच्या मागण्या शासनाकडून त्वरित पूर्ण व्होवून यातून कोंडी फुटावी यासाठी प्रतिकात्मक दहीहंडी फोडण्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी प्रतिकात्मक दहीहंडी उभा करून मुलांच्या हस्ते हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ संघटनेचे संजय साळोखे, वैभवराज राजेभोंसले, प्रकाश सरनाईक, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष चारूशिला पाटील, जिल्हा अध्यक्षा वनिता निंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष स्मिता हतकर, प्रवक्ते अश्विनी पाटील, जिल्हा संघटक सर्वदा हरणे, राजेंद्र तोरस्कर, विक्रमसिंह जरग,मनोहर सोरप, प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, राहुल अपराध, पूजा शिंदे,जयाजी घोरपडे,ऊदय पोतदार, अद्वैत कटारिया, गौरव लांडगे, फिरोज शेख उपस्थित होते.