शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी ! यंदा विक्रमी संख्येने पदवी प्रमाणपत्रांचे वितरण ! !
schedule25 Nov 26 person by visibility 49 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी-: शिवाजी विद्यापीठात येत्या २७ नोव्हेंबर २०२६ रोजी ६३ वा दीक्षान्त समारंभ आयोजित केला आहे. यंदाच्या समारंभासाठी माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग हे प्रमुख पाहुणे आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख अतिथी आहेत. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. यंदा एकूण ६०२५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. यापैकी २० हजार ५३ स्नातकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारणार आहेत अशी माहिती कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृह येथे दीक्षांत समारंभ होत आहे. विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रपती सुवर्णपदकाची मानकरी तनुजा बाजीराव साळोखे तर कुलपती पदक विजेती विद्यार्थिनी वेदिका उमेश कदम गौरविण्यात येणार आहे. कदम या इस्लामपूरच्या आहेत. तर साळोखे ही कॉमर्स अॅड मॅनेजमेंट एमबीए विभागाची विद्यार्थिनी आहे अशी माहिती कुलगुरू कामत यांनी दिली. दरम्यान राष्ट्रपती सुवर्णपदकाची मानकरी तनुजा साळोखेने हा पुरस्कार आई वडिलांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे.
यंदा विद्यापीठातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या पदवी प्रमाणपत्रांची संख्या विक्रमी आहे. ६०२५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.यामध्ये मुलींची संख्या ५८ टक्के आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्रे स्वीकारणाऱ्यामध्ये ७८५३ मुले तर १२२०० मुली आहेत. पदवी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केलेल्या आणि पोस्टाद्वारे पदवी स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४०१९७ इतकी आहे.यामध्ये १७७२७ मुले आहेत. तर पोस्टाद्वारे प्रमाणपत्र स्वीकारणाऱ्या मुलींची संख्या १७७२७ इतकी आहे. पदवी प्राप्त स्नातकांमध्ये विद्यार्थिनींची संख्या ३४६७० तर विद्यार्थ्यांची संख्या २५५८० इतकी आहे. ६३ व्या दीक्षांत समारंभात द्विभाषिक पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत. दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून दोन दिवस ग्रंथ महोत्सव भरविला आहे. गुरुवारी २६ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.सकाळी १०.३० वाजता विद्यापीठ कॅम्पसमध्ये ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन आहे.
बैठकीस प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते.