शासन नियुक्त संचालक प्रकरण, पुढील सुनावणी तीन डिसेंबर
schedule26 Nov 26 person by visibility 109 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन -:गोकुळ दूध संघावर सरकारने नियुक्त केलेले चार संचालक व त्यांच्या मतदान अधिकाराला आव्हान देणाऱ्या समविचारी आघाडीच्या याचिकेवर कोल्हापूर सर्किट बेंच येथे बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) सुनावणी झाली. सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमोर सुनावणी झाली. याप्रसंगी कोर्टाने, सरकार नियुक्त चार संचालकांना व महायुतीच्या चार संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावण्याची परवानगी सर्किट बेंचने दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी तीन डिसेंबर २०२६ रोजी दुपारी चार वाजता होणार आहे. गोकुळमध्ये २५ संचालक निवडून आले आहेत. यामध्ये समविचारी आघाडीला तेरा तर महायुतीचे बारा संचालक आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीसाठी चौदा संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे.सरकारने चार संचालक नियुक्त केले आहेत. त्या संचालकांच्या नियुक्तीला समविचारी आघाडीने आव्हान दिले आहे.