जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
schedule26 Nov 26 person by visibility 79 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील चव्हाण यांच्या पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य इंद्रजीत पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, प्रभारी समाजकल्याण अधिकारी राजेंद्र माने उपस्थित होते.