कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरणसाठी ९९ तास उपोषण- राजू एस माने
schedule24 May 25 person by visibility 51 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शहर व जिल्हयाच्या शाश्वत विकासासाठी कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची (केएमआरडीए) स्थापना करावी यासाठी उजळाईवाडी येथील राजू एस माने हे ९९ तास उपोषण करणार आहेत. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळा, मुस्लिम बोर्डिंग शेजारी हे आंदोलन होणार आहे. एक जून रोजी दुपारी दोन ते पाच जून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत उपोषण करणार आहेत. यासंदर्भातील माहिती माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर शहर व जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये विविध विकास प्रकल्पांचा समावेश आहे. सरकारने केएमआरडीएची स्थापना करुन विकासाला गती द्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली.