Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बीएनआयतर्फे शनिवारी राष्ट्रीय औद्योगिक नेटवर्किंग मेळावा, उद्योग संवाद परिसंवादइतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा परिषदेत शाहू महाराज जयंती उत्साहात साजरीराजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटीलशाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन जिपचे बजेट ९६ कोटीवर, सभापती शितल यादव यांनी सादर केले आतापर्यंतचे सर्वात मोठे अर्थसंकल्पजिपच्या सभेत सदस्यांनी घेतली शिक्षण विभागाची हजेरी, अधिकाऱ्यांच्यावर आरोप ! सीईओंनी नेमली चौकशी समिती ! !रविकिरण इंगवले यांचा शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामाभाजपही सरसावला, सोमवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे गोकुळसाठी ठराव दाखल करणारगोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ ! आमच्याकडे 1971 ठराव, महायुतीचा झेंडा फडकवणार ! मंत्री हसन मुश्रीफ!

जाहिरात

 

इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या विचारकार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

schedule26 Jun 26 person by visibility 54 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘इतिहास संशोधन क्षेत्रात डॉ. जयसिंगराव पवार यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा. ४० व्या राजर्षी शाहू पुरस्काराने त्यांचा गौरव होणे, हे कोल्हापूरच्या सुपुत्रासाठी अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंत पुरस्कार प्राप्त महान व्यक्तींच्या पंक्तीत त्यांचे आज नाव जोडले गेले.’असे उद्गार पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक स्वर्गीय डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार-२०२६’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. राजर्षी शाहू स्मारक येथे राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फ आयोजित हा कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे झाला. एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होते.

खासदार शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांचे संशोधन देश-विदेशात मान्यता पावले असून त्यांच्या संशोधनाचा अधिकृत संदर्भ म्हणून वापर केला जातो. खरा आणि वस्तुनिष्ठ इतिहास मांडणारे ते अभ्यासू संशोधक होते.’ दरम्यान समाजप्रबोधनाच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य यांचे विवेचन करणाऱ्या ‘शाहू स्मरणिका’चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन आणि निर्मितीचे कार्य डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. पवार यांच्या कन्या डॉ. मंजुश्री पवार यांनी सत्कारमूर्तींच्यावतीने मनोगत व्यक्त केले. सन्मानपत्राचे वाचन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. राजदीप सुर्वे यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes