Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
पश्चिम महाराष्ट्रात वारणा विद्यापीठाच्या कोरे अभियांत्रिकीस सर्वाधिक प्रवेश जागाडीवाय पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागतअभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!जिल्हा परिषदेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरीबाळूमामा देवालय ट्रस्ट घोटाळा : रागिनी खडके, रावसाहेब कोणकेरीवर गुन्हा दाखलअण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात मानवतेसाठी जगणाऱ्या माणसाची कहाणी - प्रा. जयसिंग दिंडेराजर्षी शाहू महाराज : एक संक्षिप्त चरित्रच्या इंग्रजी आवृत्तीचे जपानी शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुककोरे पॉलिटेक्निक येथे विद्यार्थी परिचय - मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहातबाळूमामा देवस्थानमधील गैरव्यवहारातील आरोपींना अटक करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन – डॉ. युवराज येडूरेजैन समाजाच्या हितासाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण, माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची केआयटीला पसंती ! कालसुसंगत अभ्यासक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची हमी !!

schedule03 Aug 26 person by visibility 83 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : उद्योगजगताच्या बदलत्या गरजांनुसार अभ्यासक्रमामध्ये सातत्याने सुधारणा, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती, जागतिक दर्जाच्या इंटर्नशिपच्या संधी आणि उत्कृष्ट प्लेसमेंटच्या माध्यमातून केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर (प्रदत्त स्वायत्त) यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतही विद्यार्थ्यांच्या पसंतीचे केंद्र ठरले आहे. यावर्षी इतर विभागांप्रमाणेच सिव्हिल,इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकलसारख्या कोअर ब्रँचेसमध्येही केआयटीचा कट-ऑफ वाढला आहे.
गेल्या ४३ वर्षांपासून अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण वाटचाल करणाऱ्या केआयटीने उद्योगक्षेत्राशी समन्वय साधत अभ्यासक्रमामध्ये केलेले आवश्यक बदल,कौशल्याधारित शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच देश-विदेशातील नामांकित विद्यापीठे आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उपलब्ध होणाऱ्या इंटर्नशिपच्या संधी यामुळे विद्यार्थ्यांनी केआयटीला प्राधान्य दिले असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली म्हणाले, “केआयटीची गुणवत्ता ही येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतील टीमने सातत्याने केलेल्या गुणवत्तापूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. उद्योगजगताशी कायम सुसंवाद ठेवून विद्यार्थ्यांना कौशल्याधारित, रोजगारक्षम आणि भविष्याभिमुख शिक्षण देण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे.”
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत केआयटीमध्ये प्रथम प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक डॉ. वनरोट्टी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यामध्ये वैष्णवी बागल-सिव्हील,मधुरा साळुंखे- मेकॅनिकल आणि युवराज हरेर-इलेक्ट्रीकल या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यावेळी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले. प्रवेश प्रक्रियेत केआयटीवर विश्वास दाखविल्याबद्दल सर्व विद्यार्थी व पालकांचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी आणि संस्थेचे अध्यक्ष  हुदली यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उत्कृष्ट करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचा केआयटीचा संकल्प यापुढेही कायम राहील, असा विश्वास संस्थेचे उपाध्यक्ष  सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले तसेच विश्वस्तांनी व्यक्त केला. यावेळी प्रवेश विभागाचे अधिष्ठाता डॉ. महेश शिंदे आणि सह-अधिष्ठाता प्रा. अमर टिकोळे, रजिस्ट्रार डॉ. दत्तात्रय साठे, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. मंजुनाथ हुदगी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes