Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळीमुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी

जाहिरात

 

कोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठी

schedule08 Nov 26 person by visibility 11 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उपचारांबाबतचे समाधान आणि डॉक्टरांच्या कौशल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रुग्णांच्या पालकांनी सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांना वैयक्तिक भेट म्हणून पाच लाख रुपये देऊ केले. मात्र, डॉ. मरजक्के यांनी ही संपूर्ण रक्कम स्वतःसाठी स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. त्याऐवजी मोयामोया आजाराने ग्रस्त असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांच्या उपचारांसाठी या रकमेचा उपयोग व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. डॉक्टरांचा  हा अनोखा सेवाभाव सध्या चर्चेचा ठरला आहे.

परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या आशीर्वादाने सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत सात ब्रेन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून न्यूरोसर्जरी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मेंदूच्या रक्तपुरवठ्याशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रियांमध्ये गणल्या जाणाऱ्या ब्रेन बायपास शस्त्रक्रिया देशातील मोजकेच न्यूरोसर्जन करतात. अशा विशेष शस्त्रक्रियांमध्ये डॉ. मरजक्के यांनी मिळवलेले कौशल्य कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

या कामगिरीचे विशेष महत्त्व अधोरेखित करणारी आणखी एक घटना नुकतीच घडली. कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करीत होते. मात्र, डॉ. शिवशंकर मरजक्के यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आणि त्यांनी उपचारांबाबत दिलेली माहिती समजून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या उपचारांसाठी डॉ. मरजक्के यांच्यावर विश्वास व्यक्त केला. उपचारानंतर संबंधितांनी पाच लाख रुपये डॉ. मरजक्के यांना भेट स्वरुपात देण्याचे ठरविले. मात्र मरजक्के यांनी ती भेट स्वत:साठी स्वीकारली नाही.

एका रुग्णाने कृतज्ञतेपोटी दिलेली पाच लाख रुपयांची भेट स्वतःसाठी न स्वीकारता ती समाजातील गरजू रुग्णांच्या हितासाठी वापरण्याचा घेतलेला निर्णय डॉ. मरजक्के यांच्या संवेदनशीलतेची, निःस्वार्थी वृत्तीची आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष देणारा आहे.

मोयामोया हा मेंदूच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित दुर्मिळ व गंभीर आजार असून, त्यावरील उपचार आणि ब्रेन बायपास शस्त्रक्रिया अत्यंत खर्चिक असतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या अनेक रुग्णांना आवश्यक उपचार घेणे शक्य होत नाही. अशा रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र मोयामोया सोसायटीची नोंदणी करणे, रुग्णालयाची या संस्थेशी नोंदणी करणे आणि त्याद्वारे कायमस्वरूपी मदतनिधी  उभारणे, असा डॉ. मरजक्के यांचा मानस आहे. या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत अथवा अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes