Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळीमुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांनी गोकुळ दूध संघ डॉ. डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला! धनंजय महाडिकांची सतेज पाटलांच्यावर बोचरी टीकासतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय पाचव्या स्मृतिदिनी बाबा सावंत यांच्या आठवणींना उजाळाशिक्षण चळवळीतील मी कार्यकर्ता, शाळा - शिक्षकांसाठी राबणार! पाचही जिल्ह्यात संपर्क कार्यालय, विद्यार्थ्यासाठी डिसेंबरमध्ये शिष्यवृत्ती सराव परीक्षा !!अभाविपची विद्यापीठासमोर कुलसचिवांच्याविरोधात निदर्शने, कार्यकर्ते- सुरक्षारक्षकांत झटापटतास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरी

जाहिरात

 

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळी

schedule08 Nov 26 person by visibility 18 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: दिवाळी हा आनंद, उत्साह, प्रेम आणि बंधुभावाचा सण. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सण साजरा करण्याच्या भावनेतून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बेडीव पैकी धनगरवाडा येथील धनगर समाज बांधवांसमवेत दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला.
 मंत्री आबिटकर यांनी धनगर बांधवांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी, एकोपा आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे त्यांनी सांगितले. धनगर समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक सुविधा, तसेच वाड्या-वस्त्यांवरील प्रश्न त्यांनी जाणून घेतले. डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या बांधवांपर्यंत आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गोकुळचे माजी संचालक नंदकुमार ढेंगे, राहुरी कृषि विद्यापिठाचे सदस्य दत्तात्रय उगले, कल्याणराव निकम, सभापती विक्रमसिंह पाटील, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, पंचायत समिती सदस्य सुनिल किरोळकर, प्रशांत देसाई, युवराज फगरे, मुरलीधर बुवा, राजाराम भराडे, गणपतराव शेटके, मारुती पाटील, रघुनाथ बोटे, मारुती भराडे, आनंदराव शेवाळे, रावसाहेब पाटील, चंद्रकांत गुरव, आनंदा मिटके, राजेंद्र भोसले, सागर मिसाळ उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes