खडके ॲकॅडमीचा बारावीचा निकाल शंभर टक्के
schedule02 May 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे वतीने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत सलग 11 व्या वर्षी पन्हाळा व्हॅली जुनियर कॉलेज व क्रांती जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स बोरपाडळे चा निकाल शंभर टक्के लागला. पन्हाळा ज्युनिअर कॉलेजमध्ये अनुक्रमे कु. श्रेयश सचिन सावंत 77.17 टक्के, कुमारी आदिती प्रमोद खाडे 71.17 टक्के, ईशान विक्रम पाटील, कु.कृष्णा सचिन पोवार 68.33 टक्के आणि क्रांती ज्युनिअर कॉलेजमध्ये अनुक्रमे कु. विश्व उदय पाटील 74.33 टक्के, कु.किशोर सतीश पाटील 73.50 टक्के, समृद्धी दिलीप पाटील 71.17 टक्के गुण मिळविले. संस्थापक प्राचार्य अविनाश रघुनाथ खडके, प्राचार्य क्रांती अविनाश खडके, उपप्राचार्य अयोध्या पाटील, रश्मी पोवार, शामराव पाटील, अनिकेत जोशी, अभिजीत गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.